साप्ताहिक राशिभविष्य (६ जुलै २०२५ ते १२ जुलै २०२५)
उत्तम मार्गदर्शक भेटतील
मेष : सप्ताहात चंद्रबळातून उत्तम लाभ होतील. व्यावसायिक धनवर्षाव होईल. मात्र जुगारसदृश्य व्यवहार टाळा. सप्ताहात घरात कार्यांचा माहोल राहील. तरुणांना सप्ताहात कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमातूनच मोठी गती प्राप्त होईल. काहींना उत्तम मार्गदर्शक भेटतील. सप्ताहात भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ होतील. नोकरीत विशिष्ट कामातून कर्तृत्व गाजवाल. ता. ९ व १० हे दिवस सुवार्तांतून फ्लॅशन्यूज देतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना जाहिरातीतून व्यावसायिक छान प्राप्ती होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ स्त्रीवर्गाशी वादाचा ठरेल. वैवाहिक जीवनातील पर्यावरण जपा.
व्यावसायिकांचे नवे पर्व सुरू होईल
वृषभ : चढत्या चंद्रबळातून राशीतील शुक्र भ्रमण बहारदार फळे देईल. होतकरू तरुणांचे मोठे भाग्योदय अपेक्षित आहेत. ओळखी मध्यस्थी फलद्रूप होतील. परदेशस्थ तरुणांचे नैराश्य जाईल. सप्ताहात रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती आपल्या अंगभूत गुणांतून प्रकाशात येतील. स्वतंत्र व्यावसायिकांचे एक नवे पर्व सुरू होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती एखादे अपयश धुवून काढतील. मात्र प्रेमप्रकरणात जास्त गुंतू नका. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विशिष्ट व्यावसायिक करारमदार मार्गी लागून निश्चिंती मिळेल. विशिष्ट मध्यस्थीतून लाभ होतील. पौर्णिमेजवळ पाकीट सांभाळा. वेंधळेपणा टाळा. वाहने सांभाळा.
अनुकूल ग्रहमानाचा कालखंड
मिथुन : राशीचक्रातील चंद्रबळाचा उत्तम लाभ घेणारी रास राहील. विशिष्ट चमत्कार घडतील. नोकरीत परदेशगमनाचे योग. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी पौर्णिमेजवळ ग्रहांचा एक फास्ट ट्रॅक राहील. सतत मनासारखी कामे होत राहतील. वास्तुविषयक व्यवहारातील कटकटी संपतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींसाठी पौर्णिमेजवळ मोठे अनुकूल ग्रहमान राहील. मोठी झेप घ्याल. विशिष्ट आदरसत्कारातून लाभ होतील. पर्यटन यशस्वी होतील. भावाबहिणींची कार्ये ठरतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात अन्नपाण्यातील संसर्गापासून सावध राहावे. स्त्रीवर्गाशी गैरसमज वा थट्टामस्करी सांभाळावी.
खेळाडूंना सूर गवसेल
कर्क : सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना उत्तम फलद्रूप होईल. विशिष्ट करारमदार, वाटाघाटी आणि तरुणांच्या नोकरीविषयक मुलाखती निश्चित फलदायी होतील. सप्ताहातील चंद्रबळ शुभग्रहांच्या लॉबीला चांगलेच साथ देईल. घरातील पर्यावरण छान राहील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखीतून विवाहस्थळे येतील, ज्योतिष आड आणू नका. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संध्याकाळ मोठी रम्य राहील. सप्ताहात मस्त चैन कराल. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात जनसंपर्कातून मोठे लाभ अपेक्षित आहेत. सप्ताहात शत्रू नसतील. नोकरीतील पर्यावरण सुधारेल. खेळाडूंना सूर गवसेल.
मनासारखी बदली होईल
सिंह : सप्ताहातील पौर्णिमेला घरून होणारे ग्रहयोग आणि शुभग्रहांची साथसंगत जीवनातील उत्तम संधी देतीलच. ता. ८ ते १० हे दिवस अतिशय गतिमान राहतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे फिल्ड विजयी चौकार-षटकारांचेच ठरेल. कलाकारांची स्वप्नपूर्ती होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होतील. व्यावसायिक क्षेत्रात उत्तम आर्थिक ओघ राहील. पुत्रोत्कर्षातून आनंद साजरा कराल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र नोकरीच्या मुलाखतीतून यश देणारे. काहींच्या प्रेमविवाहातील अडसर दूर होतील. देवदर्शने होतील. नोकरीत मनासारखी बदली होईल.
सरकारी कामे होतील
कन्या : पौर्णिमेकडे वाटचाल करणारा सप्ताह चंद्रकलांच्या उत्कर्षातून आजूबाजूचे भावपर्यावरण चांगलेच ठेवेल. सप्ताहाची सुरुवात घरात सुवार्तांतून प्रसन्न ठेवेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एकूणच महत्त्वाच्या कामातून अतिशय सुसंवादी राहील. घरात कार्य ठरतील. सप्ताहात विशिष्ट सरकारी कामे होतील. गुरुपौर्णिमेचे प्रभावक्षेत्र व्यावसायिक धनवर्षावाचेच. काहींची कर्जमुक्ती करणारा, चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट यशातून जल्लोषाचा. एखादा शैक्षणिक प्रश्न सुटेल. ओळखीतून विवाहस्थळे येतील. ज्योतिष आड आणू नकाच.
व्यावसायिकांना पर्वणीचा कालखंड
तूळ : सप्ताह पौर्णिमेच्या प्रभावात उत्तम परिणाम साधेल. स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताह पर्वणीसारखाच. बँकांची कामे होतील. राजकीय व्यक्तींकडून लाभ होतील. तरुणांना नोकरीच्या मुलाखतीतून फलदायी होणारा कालखंड. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींची गुरुपौर्णिमा ध्येयपथाकडे वाटचाल करवेल. ता. ९ ते १० हे दिवस सुवार्तांतून मोठे फ्लॅशन्यूज देतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहातील संध्याकाळ मोठ्या रम्य राहतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या आदरसत्कारातून नेणारा. नोकरीत बढतीची चाहूल.
वास्तुविषयक अडचणी जातील
वृश्चिक : पौर्णिमेच्या सप्ताहात चंद्र-शुक्राच्या कलांचा चांगलाच उत्कर्ष राहील. तरुणांचे गीत गाता चल होईल. अनुराधा नक्षत्राची व्यक्ती या कलांचा सर्वस्वी लाभ उठवेल. ता. ८ ते १० हे दिवस मोठ्या यशाची व सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवतील. तरुणांनी संधीचा लाभ उठवावाच. परदेशस्थ तरुणांचे प्रश्न सुटतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र व्यावसायिक आर्थिक कोंडी घालवेल. व्यावसायिक उत्सव-प्रदर्शने उत्तम फलदायी होतील. काहींची वसुलीतून कर्जमुक्ती होईल. एखादी कायदेशीर कटकट संपेल. वास्तुविषयक अडचणी जातील.
विक्रमी यशाची नोंद कराल
धनू : सप्ताहातील पौर्णिमेकडील वाटचाल गुरुभ्रमणाचा प्रभाव वाढवील. सप्ताहात न बोलता कामे होतील. नोकरीतील घडामोडी पथ्यावर पडतील. स्वतंत्र व्यावसायिकांना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र सरकारी कामांतून फलदायी होणारे. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ. घरात तरुणांना नोकरी लागेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र जीवनातील विक्रमी यशाची नोंद करवेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा वैवाहिक जीवनातून भावरम्य राहील. नवपरिणितांना अपत्य लाभाची चाहूल.
विद्युत उपकरणे जपून हाताळावीत
मकर : सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठा प्रसन्न राहील. कला किंवा छंद या माध्यमातील व्यक्तींना सप्ताह मोठा उत्साहपूर्वक राहील. उद्याचा सोमवार नोकरीत तसेच व्यावसायिक भाग्यसंकेत देईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरी मिळेल. काहींचे प्रेमविवाह सफल होतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी माध्यमांतून विशिष्ट लाभ होतील. पौर्णिमेजवळ तीर्थाटनाचे योग. सप्ताहात शत्रुत्वाच्या झळा कमी होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात शेजाऱ्याशी वाद टाळावेत. यंत्रे, वाहने आणि विद्युत उपकरणे जपून हाताळावीत.
आरोग्यविषयक पथ्ये पाळावीत
कुंभ : पौर्णिमेचा सप्ताह उत्तम जीवनदृष्टी देणारा. पौर्णिमेच्या सप्ताहात आपल्या राशीस नक्षत्र लोकांतून सहकार्य मिळेल. न बोलता प्रभाव टाकाल. अर्थातच अहंकार बाजूला ठेवा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० ते १२ हे दिवस अतिशय नावीन्यपूर्ण फळे देतील. विशिष्ट ग्रासलेली अस्वस्थता जाईल. शत्रू मित्र होतील. घरातील विशिष्ट वाद मिटतील. उद्याचा सोमवार मोठ्या व्यावसायिक उलाढालींचा. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात आरोग्यविषयक पथ्ये पाळावीत. बाकी पौर्णिमेजवळ विवाहविषयक उत्तम गाठीभेटी.
परदेशी शिक्षणाच्या संधी येतील
मीन : सप्ताहातील गुरुभ्रमणाच्या पार्श्वभूमीवरील पौर्णिमा अर्थातच गुरुपौर्णिमा आपले भावविश्व उत्तम जपणारी. नोकरीत पर्यावरण सुधारेल. ता. १० ते १२ हे दिवस विशिष्ट करारमदार, वाटाघाटी व मुलाखती यशस्वी करतील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रांच्या व्यक्तींची जिद्द वाढेल. होतकरू तरुणांना नोकरीचे उत्तम पर्याय येतील. काहींना सरकारी नोकरीचा लाभ. पती वा पत्नींचा विशिष्ट मानसन्मान चकित करेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा आरोग्यचिंता घालवणारी. घरातील तरुणांचे लांबलेले विवाह जमून येतील. परदेशी शिक्षणाच्या संधी येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.