साप्ताहिक राशिभविष्य : (६ सप्टेंबर २०२६ ते १२ सप्टेंबर २०२६)

मनुष्यप्राणी हा इतर प्राण्यांनाही आपल्यासारखे वागायला लावत असतो.
weekly horoscope 6th september 2026 to 12th september 2026

weekly horoscope 6th september 2026 to 12th september 2026

Sakal
Published on

वरिष्ठांशी वाद टाळावेत

मेष : सप्ताह एकूणच उत्सव कार्यावर खर्च करणारा. उद्याचा सोमवार विशिष्ट नवस पूर्ण करणारा. ता. ७ ते ९ हे दिवस नवपरिणितांचे भाग्योदय करेल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन फुलणारे असेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना जीवनातील स्थैर्य लाभेल. तरुणांना मुलाखतींतून यश मिळेल. व्यावसायिक तेजी राहील. काहींची सरकारी कामे होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे प्रभावक्षेत्र वादग्रस्त गाठीभेटींतून बेरंग करू शकते. गैरसमजातून वाद होऊ शकतात. वरिष्ठांशी वाद टाळा. घरातील लहान मुलांकडे लक्ष द्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com