weekly horoscope 8th january 2023 to 14th january 2023
weekly horoscope 8th january 2023 to 14th january 2023sakal

साप्ताहिक राशिभविष्य (०८ जानेवारी २०२३ ते १४ जानेवारी २०२३)

माणसाचं थबकणं, स्तब्ध होणं, अडखळणं आणि झेपावणं या सर्व क्रिया, प्रतिक्रिया किंवा ही अवस्थांतरं माणसाच्या शरीर व मनाच्या पार्श्‍वभूमीवर सतत सुरूच असतात.

कलावंतांचा मोठा भाग्योदय

मेष : शुक्रभ्रमण अतिशय बलवत्तर शुभ फळं देईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं बॅटिंग फिल्ड राहील. ता. ९ ते १० हे दिवस विशिष्ट रेकॉर्डब्रेक फळं देतील. कलावंतांचा मोठा भाग्योदय. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार व्यावसायिक गुप्तचिंता घालवेल. सप्ताहात व्यावसायिक भांडवलाचा पुरवठा होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सहलीतून करमणूक होईल.

सरकार-दरबारी सन्मान

वृषभ : राशीचा मंगळ शुक्राच्या शुभयोगात ग्रहांचं मैदान उत्तमरीत्या ताब्यात घेईल. तरुणांना प्रगतीची नवी दालनं उघडतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ ते १२ हे दिवस अतिशय प्रवाही राहतील. शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून मोठं अनुकूल ग्रहमान. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचा सरकार-दरबारी सन्मान, परदेशगमनाची संधी.

गाठीभेटींतून चमत्कार घडतील

मिथुन : सप्ताहात प्रलोभनं टाळावीत. जुगार नको. बाकी सप्ताहातील शुभ ग्रहांची रसद छानच उत्साह ठेवेल. विशिष्ट सहली, करमणुकीतून आनंद घ्याल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती धमाल करतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात गाठीभेटींतून चमत्कार घडवेल. उत्तम विवाहस्थळं येतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी मिळेल.

राजकीय मदत होईल

कर्क : सप्ताहात मोठी दमदार वाटचाल अपेक्षित आहे. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सतत माणसांचं सहकार्य लाभेल. अर्थातच ग्रीन सिग्नल सतत मिळतील. सप्ताहाचा शेवट मोठा गोड हाईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींची खंत जाईल. शत्रू मित्र होतील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय वरदहस्त मिळेल.

नोकरीत बदलीतून लाभ

सिंह : सप्ताह व्यावसायिक मंदी घालवेल; परंतु प्रलोभनं टाळा. सरकारी नियमभंग करू नका. बाकी पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात बुद्धिचातुर्यातून मोठे लाभ उठवतील. नोकरीत बदलीतून लाभ. कलाकारांचं परदेशगमन. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट कोर्ट प्रकरणातून मुक्त करणारा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी घरात राग आवरावा.

अंगारकी मोठी भाग्यदायक

कन्या : सप्ताहातील शुक्रभ्रमण ग्रहांचा पट ताब्यात घेईल. सतत इतरांचं लक्ष वेधून घ्याल. तरुणांनो, प्रेमाचे अँटिने रोखून धरा. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती मोठ्या सेलिब्रिटी होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० ची अंगारकी मोठी भाग्यसूचक राहील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गर्दीच्या ठिकाणी विषाणुसंसर्ग होऊ शकतो.

वलयांकित करणारा कालखंड

तूळ : सप्ताहातील मंगळाची स्तंभी स्थिती अतिशय दखलपात्रच वाटते. वाहनं सांभाळा. बाकी शुक्रभ्रमण सप्ताहावर विलक्षण अंमल करेल. ता. ९ ते ११ हे दिवस बुध-शुक्राचेच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना महत्त्वाच्या कामांतून शुभ विवाहविषयक गाठीभेटी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ चा बुधवार वलयांकित करणारा. वास्तुयोग.

राजकारण टाळा, नियम पाळा!

वृश्‍चिक : सप्ताह मंगळ-शुक्राच्या संगतीतून फलदायी होईलच; मात्र प्रलोभनं टाळा. सरकारी नियमभंग नको. बाकी सप्ताह शुभ ग्रहांची उत्तम रसद पुरवेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ ते १४ हे दिवस जीवनात जान आणणारेच. ज्येष्ठ व्यक्तींनी सप्ताहात वैयक्तिक भावजीवन जपावं आणि राजकारण नको, घरी आणि दारी.

प्रवासात जपा, धनलाभ होईल

धनू : सप्ताहातील वक्री बुध आणि मंगळ नैसर्गिक पाठबळ ठेवणार नाहीत. प्रवासात जपा, संसर्ग टाळा, सामाजिक जीवन सांभाळा. बाकी बुद्धिजीवी मंडळींना त्यांच्या छंद, उपक्रमांतून सप्ताह साथच देईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात घरातील प्रिय व्यक्तींच्या भाग्योदयातून प्रसन्नच ठेवेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा शेवट धनलाभातून प्रसन्न ठेवणारा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी.

ओळखी, मध्यस्थीचा लाभ

मकर : राशीतील शुक्रभ्रमण मंगळाशी योग करत मोठी ऊर्जा घेईल. व्यावसायिक उपक्रम यशस्वी होतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ ते १३ हे दिवस मोठे गतिमान राहतील. वास्तुविषयक व्यवहार. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखी, मध्यस्थीचा लाभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी वैवाहिक जीवनात संशय टाळावा, चहाडी चुगली करू नये.

गैरसमज, भांडणं टाळा

कुंभ : स्तंभी मंगळाची स्थिती संमिश्र स्वरूपाची फळं देईल. भावंडांशी गैरसमज, भांडण टाळा. प्रेम प्रकरणात वाहून जाऊ नका. बाकी सप्ताहारंभ धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींवर गुरुकृपाच करणारा. नोकरीच्या मुलाखती होतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ ते १३ हे दिवस गाठीभेटी यशस्वी करणारे. पूर्वाभाद्रपदाच्या व्यक्तींना मंगळवार कलहाचा.

विशिष्ट अपवादात्मक लाभ

मीन : ग्रहांचं फिल्ड सप्ताहात विशिष्ट अपवादात्मक लाभ देईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट वैयक्तिक सुवार्तांतून चर्चेत ठेवेल. व्यावसायिक नवे पर्याय फलद्रूप होतील. बॅंकेची कामं होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सार्वजनिक जीवनात गावगुंड त्रास देऊ शकतात. मंगळवार जपावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com