साप्ताहिक राशिभविष्य : (०८ मार्च २०२६ ते १४ मार्च २०२६)

चंद्राची पंचमी तिथी निसर्गातला एक सूक्ष्म स्वर असल्यासारखीच आहे आणि हा पंचमस्वर नाभी, कंठ, हृदय, मस्तक आणि छाती या पाच स्थानांतून प्रसरण पावत राहतो.
weekly horoscope 8th march 2026 to 14th march 2026

weekly horoscope 8th march 2026 to 14th march 2026

Sakal
Published on

थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ होतील

मेष : सप्ताह तरुणांना आजची रंगपंचमी भाग्यबीजे पेरणारीच ठरणार आहे. हृद्य गाठीभेटींतून रंगतदार सहवास होतील. प्रेमिकांना अतिशय जवळ आणणारी रंगपंचमी राहील. सप्ताह व्यावसायिकांना उत्सव प्रदर्शनातून उत्तम प्रतिसाद देणाराच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना आगतस्वागतातून आणि विशिष्ट मानसन्मानातून नैराश्य जाईल. मात्र सप्ताहात वाहने जपूनच चालवा. नवपरिणितांची स्वप्ने या रंगपंचमीच्या सप्ताहात निश्चितच पूर्ण होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून मोठा सुसंगतच राहील. सतत ऑनलाइन कनेक्टिव्हिटी ठेवाच. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट पुत्रचिंता घालवेल. काहींना थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ होतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com