

weekly horoscope 9th august 2026 to 15th august 2026
रेंगाळलेले व्यवहार होतील
मेष : सप्ताहातील ग्रहांचे फिल्ड तानमान ओळखूनच वागण्याचे. जुगारसदृश व्यवहार टाळा. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार, शुक्रवार नोकरीतील घडामोडींतून प्रसन्न ठेवतील. तरुणांना सप्ताह परदेशात भाग्योदयाचा. ग्रहणयुक्त अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी घरातील भावपर्यावरण जपावं. आई-वडिलांशी वाद टाळा. तरुणांनी वाहने सांभाळावीत. रस्त्यावरील बाचाबाची टाळा. सिग्नल सांभाळा. बाकी सप्ताहाच्या शेवटी विशिष्ट रेंगाळलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. भावाबहिणींचे विशिष्ट प्रश्न मार्गी लागतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येजवळ नैसर्गिक घटना-दुर्घटनांतून नुकसानीचे प्रसंग येऊ शकतात. अवधान ठेवा.