weekly horoscope June 28 to July 4, 2025 Sakal
Horoscope | राशी भविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : (२८ जून ते ४ जुलै २०२५)
तुम्हाला हवी तशी गती कोणत्याच कामात येत नसल्याने तुम्ही सध्या मनावर संयम ठेवणे गरजेचे आहे. ग्रहांची अनुकूलता लाभल्यावर आशेचा किरण दिसेल.
अनिता केळकर
मेष
कामामध्ये अडचणी आल्या, तरी त्यावर मात केल्याशिवाय यश मिळणार नाही. हातामध्ये मिळणाऱ्या पैशाचे गणित मागे-पुढे झाल्यामुळे काही बेत पुढे ढकलावे लागतील. व्यवसायात नियोजनबद्ध काम करा. प्रतिस्पर्ध्यांवर नजर ठेवा. नोकरीमध्ये आपले काम पडताळून मगच ते वरिष्ठांपुढे ठेवावे.