Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

साप्ताहिक राशिभविष्य : (३० जानेवारी २०२२ ते ५ फेब्रुवारी २०२२)

मन, शरीर आणि प्राण यांचा अंतर्बाह्य खेळ म्हणजेच माणसाचे जीवन आहे. प्राणावर आरूढ होऊन मन शरीराला घट्ट पकडून घोडेस्वार होते. वस्तू एकच आहे. त्यामुळेच आत्म्याला आत्मवस्तू म्हटले आहे.
Published on

विवाहविषयक गाठीभेटी कराच

मेष : सप्ताह उमलत्या तरुणांना छानच ! आजच्या रविवारी विवाहविषयक गाठीभेटी कराच. भरणी नक्षत्राच्या तरुणांना आजची चंद्र-शुक्र युती एक प्रेमाचे स्पंदन ठेवत प्रेमाचा बुस्टर देईल. उद्याचा सोमवार अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी देणारा. ता. ३ चा गुरुवार मोठ्या सुवार्तांचा. बाकी अमावस्येचं प्रभावक्षेत्र रवी-शनी युतीयोगाच्या प्रभावक्षेत्रात शत्रुत्वाचे.

कलाकारांचा मोठा भाग्योदय

वृषभ : सप्ताहातील रवी-शनी युतीचा ट्रॅक अमावस्येजवळ वृद्धांना खराब. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना वेदनायुक्त व्याधींतून त्रास. रोहिणी नक्षत्रास नोकरीतील राजकारण त्रास देईल. बाकी परदेशस्थ तरुणांना अफलातून संधी येतील. ता. ३ फेब्रुवारीचा गुरुवार कलाकारांचे मोठे भाग्योदय करेल. शनिवार मोठ्या मौजमजेचा.

कलागुणांना प्रसिद्धी

मिथुन : आजचा रविवार मोठा अजब राहील. चंद्र आणि शुक्र यांची स्थिती अफलातून राहील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात वैयक्तिक कलागुणांतून प्रसिद्धीची. बाकी अमावस्येचं प्रभावक्षेत्र चोरी-नुकसानींतून बेरंगाचे. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शेवटास मातृपितृचिंता सतावेल. भाजणं, कापणं जपा.

स्वतंत्र व्यावसायिकांना छान काळ

कर्क : अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात रवी-शनी युतीयोगाचे एकप्रकारचे सेन्सॉर राहील. नोकरीत वरिष्ठ जपा. चहाडी-चुगली टाळा. सहवासातील सौंदर्यवती जपा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या टार्गेट करू शकते. बाकी स्वतंत्र व्यावसायिकांना ता. ३० व ३१ हे दिवस छानच. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट छानच!

मार्केटिंग यशस्वी होईल

सिंह : अमावस्येच्या प्रभावक्षेत्रातील ग्रहमान वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर खराब वाटते. भांडण उकरू नका. बाकी आजचा रविवार आणि उद्याचा सोमवार शुभ ग्रहांच्या जबरदस्त कनेक्‍टिव्हिटीचा. पूर्वा व्यक्तींचे मार्केटिंग यशस्वी होईल. एखादी व्यक्ती प्रेमात पडेल. ता. ३ चा गुरुवार गुरूकृपेचाच ! शनिवारी चैन-चंगळ.

प्रकृतीची पथ्ये पाळाच

कन्या : उत्तरा व्यक्तींनी सप्ताहात एकूणच पथ्ये पाळावीत. बोलबच्चन मित्रांची संगत टाळावी. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ प्रकृतीविषयक पथ्ये कटाक्षाने पाळावीत. श्‍वानदंशापासून जपा. बाकी सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मंगळ-शुक्राचाच! अर्थातच व्यावसायिक मोठी प्राप्ती!

गुणी व्यक्तींचा भाग्योदय

तूळ : अमावस्येजवळ रवी-शनी युतीयोगाचा ट्रॅक राहील. या पार्श्‍वभूमीवर हर्षलचीही हाय टेन्शन वायर राहील. नेमस्त, शिस्तबद्ध तसेच संयमी व्यक्तींनाच शुभ ग्रहाची कनेक्‍टिव्हिटी राहील. सप्ताह गुणी व्यक्तींचा भाग्योदयच करेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींच्या सहवासातील अहंकारी व्यक्तीचा उपद्रव. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींबद्दल गैरसमज होतील.

नोकरीच्या संधी येतील

वृश्‍चिक : आजचा रविवार आपल्यावर स्त्रीग्रहांचा मोठा अनुग्रह करणारा. सतत सुगंधित झुळका येतील. सप्ताहात तरुणांचे मोठे भाग्योदय अपेक्षित आहेत. ता. ३० व ३१ हे दिवस मोठी भाग्यबीजे पेरतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं फिल्ड मित्रचिंतेचे. कुवार्तेतून अस्वस्थ राहाल.

मोठे चमत्कार घडतील

धनु : सप्ताहात घरातील मानसिक पर्यावरण जपा. अमावस्येजवळ काळजी घ्या. सप्ताहात सट्टेबाजी नको. आजचा रविवार चंद्र-शुक्राच्या विशिष्ट स्थितीतून मोठे चमत्कार घडवेल. उद्याचा सोमवार तरुणांना नोकरी देणारा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना "खुल जा सिम सिम!'' पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक मोठी प्राप्ती.

शुभ ग्रहांची साथ लाभेल

मकर : सप्ताहातील अमावस्येचं प्रभावक्षेत्र जरा अपवादात्मक राहील. शत्रुत्वाच्या पार्श्‍वभूमीवर जपाच. कोर्टप्रकरण उद्‌भवू देऊ नका. घरातील तरुणांची मानसिकता जपा. बाकी शुभ ग्रहांचा अंडरकरंट श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना जाणवेलच. कलाकारांचे भाग्योदय. उत्तराषाढा व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता. धनिष्ठा व्यक्तींना गावगुंडांचा त्रास.

कुयोगांवर मात कराल

कुंभ : कुयोगांवर मात करणारे ग्रहमान आहेच. मात्र सप्ताहातील ता. १ फेब्रुवारीची अमावस्या एक व्हायरस असेल. मानसिक आरोग्य जपा. संशयीपणा बाजूला ठेवा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार शुभसंकेत देईल. बुद्धिजीवी मंडळींना मोठे लाभ. धनिष्ठा नक्षत्रास पुत्रोत्कर्ष. पूर्वाभाद्रपदा व्यक्तींची भाऊबंदकी झोप उडवेल.

रेंगाळलेले व्यवहार मार्गी लागतील

मीन : स्त्रीग्रहांचे एक अदृश्‍य राज्यच राहणार आहे. अर्थात त्यांचा स्वर पकडल्यासच ! ता. ३० व ३१ हे दिवस मोठे मजेदार राहतील. रेंगाळलेले व्यवहार होतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची परदेशी लिंक लागेल. रेवती व्यक्तींनी अमावास्येजवळ घरात फालतू वाद टाळावेत. शेजारी सांभाळा. गैरसमज नकोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com