yearly rashi bhavishya horoscope in marathi of this year october 2026 to october 2027 all rashi
sakal
मेष
नोकरीत बढती : यशाचे पर्व
दिवाळीपासून सुरू होणाऱ्या तुमच्या नव्या आयुष्यातील या कालावधीत मेष राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहस्थितीनुसार जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये हळूहळू पण ठोस सुधारणा दिसून येईल. २०२७ चा पूर्वार्ध आव्हानात्मक असला, तरी त्यातून तुम्ही अधिक मजबूत आणि परिपक्व व्हाल. या वर्षात करिअरमध्ये महत्त्वाचे टप्पे गाठण्याची संधी मिळेल. ऑक्टोबर २०२६ ते जानेवारी २०२७ यादरम्यान काही नवीन संधी किंवा बदल दिसू शकतात, उदाहरणार्थ, नोकरीत बदल किंवा बढती. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे योग आहेत. त्यानंतरचा काळ मेहनतीचा असेल. या काळात घेतलेले निर्णय पुढील कालखंडात फायदेशीर ठरतील. जुलै ते ऑक्टोबर २०२७ यादरम्यान कामाचे फळ मिळेल आणि मानसन्मान वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी विस्तार, नवीन भागीदारी आणि दीर्घकालीन प्रोजेक्ट्समध्ये यशाचे संकेत आहेत. आर्थिकदृष्ट्या हा काळ प्रगतीकारक असला, तरी आर्थिक स्थितीबाबत चंचलता राहील.
सुरुवातीला (ऑक्टोबर-डिसेंबर २०२६) खर्च वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी ते एप्रिल २०२७ यादरम्यान उत्पन्नात वाढ आणि नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. मे ते ऑगस्ट २०२७ या काळामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत- मोठ्या निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगा. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२७ या काळामध्ये आर्थिक स्थैर्य व बचतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
या वर्षात नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल आणि समज वाढेल. कुटुंबात काही शुभकार्य किंवा आनंदाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदारासोबत काही वेळा मतभेद होण्याची शक्यता आहे. विशेषत- वर्षाच्या सुरुवातीला, पण संवादाने ते दूर होतील. मित्र आणि नातेवाइकांकडून सहकार्य मिळेल. नवीन ओळखी आणि नाती तयार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीकारक आहे. एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात प्रगती होईल. एकूण आरोग्य चांगले राहील, पण ताणतणावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. डिसेंबर २०२६ ते मार्च २०२७ यादरम्यान थकवा किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम केल्यास ऊर्जा टिकून राहील.
सावधगिरीचा काळ -
ऑक्टोबर-डिसेंबर २०२६, मे-जून २०२७
सकारात्मक काळ -
जानेवारी-एप्रिल २०२७, जुलै-ऑक्टोबर २०२७