कुलदीपची कमाल, राहुलची धमाल

बुधवार, 4 जुलै 2018

इंग्लंडने 12व्या षटकात धावसंख्येचे शतक पूर्ण झाले होते आणि अवघा एक फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर कुलदीप यादवने अफलातून फिरकी गोलंदाजी करून एक ना दोन तब्बल 5 फलंदाजांना बाद केले आणि 1 बाद 100 धावसंख्येवरून इंग्लंडचा डाव 8 बाद 159 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले. त्यानंतर विजयाकरीता 160 धावा करताना लोकेश राहुलने नाबाद 101 धावांची जबरदस्त आक्रमक शतकी खेळी सादर करून भारतीय संघाला पहिला सामना सहज जिंकून दिला.