#SaathChal विठुनामाचा गजर...

Sunday, 8 July 2018

संतांचे अभंग गात वैष्णवांच्या सेवेचा आनंद घेत पुणेकरांनी रविवारी माउली व तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेतले. दोन्ही पालख्यांतील सातशेहून अधिक दिंड्या पुण्यनगरीत मुक्कामी विसावल्या होत्या. सामाजिक संस्था, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रविवारची सुटी घालवली ती वारकऱ्यांच्या सेवेत. वारकऱ्यांसमवेत अभंग, भारुडे गात आबालवृद्धांनी विविध दिंड्यांतील कीर्तन, प्रवचनाचा आनंद घेतला. विठुनामाच्या गजराने पुण्यनगरी दुमदुमली होती.