#SaathChal अवघे गरजे पंढरपुर ......चालला नामाचा गजर

Monday, 9 July 2018

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा "ज्ञानेबो-तुकाराम'च्या जयघोषात पुण्यनगरीचा सोमवारी पहाटे निरोप घेत होता. पंढरीच्या ओढीने वैष्णवांचा मेळा झपाझप पावले टाकत होता. त्यात भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत शहराच्या वेगवगेळ्या भागातील, विविध क्षेत्रातील "आधुनिक पुंडलिक' वारीच्या वाटेत सहभागी होत होते. त्यात जैन, ख्रिश्‍चन, शिख अशा वेगवेगळ्या धर्मातील लोकही सहभागी झाले होते. 