धायरी, वडगाव परिसरातील गौराई

Sunday, 8 September 2019

धायरी - धायरी, वडगाव परिसरात घरोघरी गौराईंचे आगमन झाले होते. विधिवत पूजा-अर्चा करून पहिल्या दिवशी मेथीच्या भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. नातेवाईक, आप्तेष्ट, मैत्रिणींसह हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेतला गेला. अनेक घरांत गौराईची स्थापना करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. काहींकडे गौरीचे मुखवटे असतात, तर काही ठिकाणी परंपरेनुसार गावच्या पाणवठ्यावर जाऊन पाच खडे आणून त्याची पूजा करतात. तेरड्याच्या झाडाची गौरीपूजा होत असते. तेरड्याच्या झाडाची मुळे म्हणजे गौरीची पावले असतात, असे मानण्यात येते.

धायरी - धायरी, वडगाव परिसरात घरोघरी गौराईंचे आगमन झाले होते. विधिवत पूजा-अर्चा करून पहिल्या दिवशी मेथीच्या भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. नातेवाईक, आप्तेष्ट, मैत्रिणींसह हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेतला गेला. अनेक घरांत गौराईची स्थापना करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. काहींकडे गौरीचे मुखवटे असतात, तर काही ठिकाणी परंपरेनुसार गावच्या पाणवठ्यावर जाऊन पाच खडे आणून त्याची पूजा करतात. तेरड्याच्या झाडाची गौरीपूजा होत असते. तेरड्याच्या झाडाची मुळे म्हणजे गौरीची पावले असतात, असे मानण्यात येते. त्यामुळे घरोघरी उत्साही वातावरण निर्माण झाले होते.