आबालवृद्धांचा लाडका विघ्नहर्ता शुक्रवारी घराघरांत विराजमान झाला आणि सार्वजनिक मंडळांच्या गणरायांचेही भर पावसात सळसळत्या उत्साहात आगमन झाले. पारंपरिक वाद्यांचा गजर, ‘मंगलमूर्ती मोरया’, ‘मोरया रे बाप्पा मोरया’चा अखंड जयघोष आणि कोल्हापुरी फेट्यासह अस्सल मराठमोळा पोशाख परिधान करून कोल्हापूरकरांनी बाप्पांच्या आगमनाच्या मिरवणुका काढल्या. महिला व मुलींच्या हस्तेही यंदा मोठ्या प्रमाणावर गणेश आगमन झाले. त्याची ही चित्रमय झलक. (सर्व छायाचित्रे -बी. डी. चेचर, नितीन जाधव)