- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- निवडणूक
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
उन्हाळ्यात Acidity होतेय! हे पाच पदार्थ ठरतील फायद्याचे

सध्या उन्हाळा भरपूर आहे. अशावेळी शरीर हायड्रेड राखणे गरजेचे असते. काही पेय, फळं खाल्लाने शांत वाटते. पोटात गरम होत नाही. तसेच अॅसिडिटीही कमी होते. अनेकांना उन्हाळ्यात अॅसिडिटी होण्याचा त्रास होतो. तब्येतीच्या तक्रारी होतात. त्यामुळे या काळात काही पदार्थ खाणे गरजेचे असते.

१) नारळ पाणी- नारळ पाण्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात.नारळाच्या पाण्यात फायबरचे प्रमाणही भरपूर असते आणि त्यामुळे नियमितपणे मलप्रवाह होण्यास मदत होते. अॅसिडिटीपासूनही आराम मिळतो.

२) थंड दूध- अॅसिडीटीपासून आराम मिळविण्यासाठी दूध पिणे फायद्याचे ठरते. छातीत होणारी जळजळ कमी होते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला पोटात आम्ल वाढले किंवा छातीत जळजळ होते तेव्हा एक ग्लास थंड दूध पिणे केव्हाही चांगले.

३) दही- ताक- दुधाबरोबरच दही आणि ताक अॅसिडिटी कमी करण्यासाठी खूप गुणकारी आहेत. हे घटक पोटाला थंडावा देतात. त्यातील नैसर्गिक जीवाणू अॅसिडिटी तयार होऊ देत नाहीत. त्यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते. जेवणानंतर नियमितपणे दही आणि ताक प्यायल्यास अॅसिडिटी होण्याची शक्यता कमी होते.

४) केळं- अॅसिडिटी कमी करण्यासाठी केळं हा चांगला पर्याय आहे. केळ्यात असणारे पॉटेशिअम पोटात श्लेष्मा निर्माण करतो. ज्यामुळे शरीरातील पीएच पातळी कमी होते. याशिवाय, केळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात जास्त पिकलेली केळी खाल्ल्याने अॅसिडिटी दूर राहते.

५) कलिंगड - कलिंगडात अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पोटाच्या इतर आजारांपासून संरक्षण होते. कलिंगडात पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने शरीराला हायड्रेट राखण्यासाठी तसेच पीएच पातळी कमी करण्यास मदत करते. सफरचंद आणि पपई यासारखी इतर फळांमधूनही फायबर चांगले मिळते. ही फळे अॅसिडीटी दूर करण्यासाठी मदत करतात.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.