74th Republic Day : साडेतीन शक्तिपीठे, नारीशक्ती; महाराष्ट्राच्या चित्ररथाचे लक्षवेधी Photos

Maharashtra Chitrarath
Maharashtra Chitrarath Sakal
Updated on

आज देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने दिल्लीतील लाल किल्ल्यावरील कर्तव्यपथावर भारताच्या तिन्ही दलाच्या सैनिकांकडून शक्तिप्रदर्शन आणि पथसंचलन करण्यात येते. त्याचबरोबर देशातील विविध राज्याच्या चित्ररथाचे प्रदर्शन करण्यात येते.

२६ जानेवारीला दिल्ली कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात देशातील विविध राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात.
२६ जानेवारीला दिल्ली कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात देशातील विविध राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात.Sakal
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र ‘नारीशक्तीचा जागर’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला. या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र ‘नारीशक्तीचा जागर’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला. या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.Sakal
या चित्ररथामध्ये देवीच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घडवण्यात आले असून नारीशक्तीचे प्रदर्शन करण्यात आले आहे.
या चित्ररथामध्ये देवीच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घडवण्यात आले असून नारीशक्तीचे प्रदर्शन करण्यात आले आहे. Sakal
यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहुरची रेणुकादेवी आणि वणीची श्री सप्तश्रुंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहुरची रेणुकादेवी आणि वणीची श्री सप्तश्रुंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. Sakal
त्याचबरोबर या चित्ररथात राज्यातील वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती, पोतराज, वारकरी, संबळ वादक यांचाही समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर या चित्ररथात राज्यातील वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती, पोतराज, वारकरी, संबळ वादक यांचाही समावेश करण्यात आला आहे.Sakal
यावेळचा महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्यपथावर लक्ष्यवेधी ठरला.
यावेळचा महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्यपथावर लक्ष्यवेधी ठरला.Sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com