संगीतकार ए. आर. रहमान (AR RAHMAN) यांची मुलगी खातिजा रहमान हिचा विवाह रियासदीन शेख मोहम्मदशी यांच्याशी पार पडला. ही आनंदाची बातमी ए आर रहमान यांनी स्वतः दिली. आपल्या मुलीच्या लग्नाचे फोटो त्यांनी इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. या नवविवाहीत दाम्पत्याविषयी थोडक्यात माहिती..
खातिजाचा जन्म चेन्नई मध्ये झाला आहे. तिने कॉमर्स विषयातून आपले शिक्षण पूर्ण केले. ती स्वतः उत्तम गायिका असून संगीत क्षेत्रात विविध प्रयोग करत आहे. तिचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. शिवाय सामाजिक कामातही तिचे मोठे योगदान आहे.
रियासदीन शेख मोहम्मद हा नामांकित ऑडिओ इंजिनियर आहे. गेली बरीच वर्षे तो ए. आर. रहमान यांच्यासोबत काम करत आहे.
खातिजा आणि रियासदीन शेख मोहम्मद यांचा २९ डिसेंबर २०२१ रोजी साखरपुडा (सगाई) झाला होता. त्याबद्दल दोघांनीही समाजमाध्यमांवर माहिती दिली होती.
नुकताच या जोडप्याचा निकाह पार पडला. या सोहळ्यातील फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
या फोटोत ए आर रहमान, त्याची पत्नी सायरा बानो आणि त्यांची मुले, आमीन आणि रहीमा आणि नवविवाहित जोडपे दिसत आहेत. ए आर रहमानची आई करीमा यांचा फोटोही यावेळी आशीर्वाद म्हणून ठेवण्यात आला होता.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.