पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जूनला पुणे दौऱ्यावर आहे. या दरम्यान ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहे. या खास सोहळ्यासाठी त्यांच्याकरीता एक पगडी तयार करण्यात आली आहे. सध्या या पगडीची सगळीकडे चर्चा होत आहे.
नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासाठी बनविण्यात येणारी ही पगडी पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून खास तयार करण्यात आली.
ही पगडी रेशमी कापडापासून तयार करण्यात आली असून पगडी तुळशीच्या माळांनी सुंदररित्या सजवली आहे. सुंदर पांढऱ्या रंगाची ही पगडी वारकरी सांप्रदायिकतेचा ओळख दर्शवत आहे
संत तुकाराच्या अभंगातील ओळी “भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हाणू काठी” या पगडीवर लिहिल्यात. सोबतच पगडीवर विठोबाची प्रतिमा देखील आहे.
सध्या ही पगडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी या आधीही मोदींसाठी वेगवेगळ्या डिझाईनच्या पगडी तयार केल्या आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.