esakal | 'आई कुठे काय करते' मालिकेतील 'यश'ची पत्नी आहे 'पानिपत'मधील ही अभिनेत्री

बोलून बातमी शोधा

'आई कुठे काय करते' मालिकेतील 'यश'ची पत्नी आहे 'पानिपत'मधील ही अभिनेत्री
By
स्वाती वेमूल
Abhishek Deshmukh and his wife Krutika Dev

'स्टार प्रवाह' या वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली.

मालिकेत अरुंधतीचा मुलगा अर्थात यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख साकारतोय.

अभिषेक खऱ्या आयुष्यात विवाहित असून त्याची पत्नी कृतिका देव हीसुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

अभिषेक आणि कृतिका २०१८ मध्ये लग्नबंधनात अडकले.

कृतिकाने 'राजवाडे अँड सन्स', 'हॅपी जर्नी' या मराठी तर 'पानिपत' आणि 'हवाईजादा' या हिंदी चित्रपटांत भूमिका साकारल्या.

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानिपत' या चित्रपटात कृतिकाने राधिका बाईंची भूमिका साकारली होती.