PHOTO: सिरीयलमध्ये दरारा निर्माण करणाऱ्या कोमोलिकाचा खऱ्या आयुष्याचा संघर्ष | Urvashi Dholakia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO: सिरीयलमध्ये दरारा निर्माण करणाऱ्या कोमोलिकाचा खऱ्या आयुष्याचा संघर्ष

Urvashi Dholakia

टीव्हीतील प्रसिद्ध खलनायिका उर्वशी ढोलकिया ऊर्फ कोमोलिका आजही लोकांमध्ये आपल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. लोकप्रिय टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी'मधील कोमोलिकाची भूमिका साकारणारी उर्वशी आज आपला वाढदिवस साजरा करित आहे. उर्वशी आज ४४ वर्षांची झाली आहे. खलनायिकेची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्या जीवनात अनेक संघर्षांशी सामना केला आहे. आयुष्याच्या चढ-उतारात तिने स्वतःला नेहमी सिद्ध केले. वाढदिवसानिमित्त चला या अभिनेत्रीसंबंधीत काही गोष्टी जाणून घेऊ या...

उर्वशी ढोलकियाने कमी वयातच अनेक संघर्ष पाहिले. तिने केवळ १६ वर्षी विवाह केला. खूपच कमी वयातच ती आई झाली होती. अभिनेत्रीने १७ व्या वर्षीच दोन जुळे मुले सागर आणि क्षितिजला जन्म दिला होता. कमी वयात झालेला विवाह फार काळ टिकला नाही आणि विवाहाच्या दोन वर्षानंतर तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने सिंगल पेरेंट म्हणूनच दोन्ही मुलांना वाढवले.

घटस्फोटानंतर उर्वशीने कधीही दुसऱ्या विवाहाचा विचार केला नाही. मात्र अभिनेत्रीचा संबंध अभिनेता अनुज सचदेवाबरोबर जोडले गेले होते. दोघेही काही दिवस डेटवर होते. नंतर दोघांचेही नाते तुटले. अनुज आणि उर्वशी डान्सिंग रिअलिटी शो नच बलियमध्येही दिसले होते.

उर्वशीने अभिनय करिअरला ६ व्या वर्षी एका जाहिरातीतून केली होती. त्यानंतर अभिनेत्रीने नंतर आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही शो श्रीकांतमधून केली होती. मात्र तिला ओळख मिळाली २००१ मध्ये आलेल्या कसौटी जिंदगी या मालिकेतून मिळाली. या मालिके व्यतिरिक्त तिला देख भाई देख, घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली, कही तो होगा, घर एक मंदिर, कहानी तेरी मेरी, बेताब दिल की तमन्ना है, बडी दूर से आए हैं आदी टीव्ही कार्यक्रमातही काम केले आहे.

या व्यतिरिक्त अभिनेत्री टीव्हीवरील प्रसिद्ध आणि चर्चित रिअलिटी शो बिग बाॅसच्या सहाव्या सिझनची विजेताही ठरलेली आहे. यानंतर त्यांचे फॅन फाॅलोइंगमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. टीव्ही जगतात दोन दशकांपेक्षा जास्त वेळेपासून प्रेक्षकांच्या मनोरंजन करत असलेल्या उर्वशी टीव्हीच्या अनेक सुपरहिट शोजची हिस्सा राहिली आहे. कलर्स चॅनलवरील एकता कपूरच्या टीव्ही मालिका नागिन ६ मध्ये अभिनय करताना दिसत आहे. या व्यतिरिक्त ती नेहमी आपल्या मुलांबरोबर सोशल मीडियावर रिल्स शेअर करतानाही दिसते.

टॅग्स :Bollywood Newsekta kapoor