Food: पोळी करण्यासाठी पीठ मळल्यावर किती वेळाच्या आत पोळ्या कराव्यात ?
वेळ वाचवण्यासाठी तुम्हीही रात्रीच्या वेळी पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवत असाल तर मात्र आजच थांबा. फ्रीजमध्ये ठेवलेल्या पदार्थांचे पोषण सत्व हे थंड तापमानात निघून जाऊ शकते
फ्रीजमध्ये ठेवलेल्या पदार्थांचे पोषण सत्व हे थंड तापमानात निघून जाऊ शकते.
शिळ्या पिठाच्या पोळ्या खाणे हे तुमच्या शरीरासाठी विषाप्रमाणे काम करू शकते.
आपलं पोटच नव्हे तर संपूर्ण आरोग्य बिघडू शकतं.
साधारण 7 ते 8 तासानंतर कुठलाही पदार्थ हा शिळा आहे असे मानले जाते.
फ्रीजमध्ये पीठ ठेवल्यावर काही वेळाने यातील माइक्रोन्यूट्रिएंट क्षमता कमी होऊ शकते यामुळे मूळ पोषण वगळता आपल्या शरीरात केवळ फॅट्सच जात असतात.
बहुतांश वेळ पीठ आंबटही होऊ शकते.
फ्रीजमध्ये जरी तुम्ही पीठ झाकून ठेवलं तरी काही प्रमाणात अन्य पदार्थ, भाज्या यामुळे तयार झालेली हवा त्या पिठाला सुद्धा लागते व तिथे त्याची आंबण्याची प्रक्रिया सुरु होते
साधारणपणे अर्धा तासापेक्षा अधिक काळ पीठ ठेवू नये. फ्रीजमध्ये तर अजिबातच ठेवू नये.
ताज्या मळलेल्या पिठाच्या पोळ्या खाल्ल्याने पचनासह डायबिटीज, रक्तदाब असेही त्रास नियंत्रणात राहण्यास मदत होते.