Akshaya-Hardeek Wedding: गोड गोजिरी..अक्षया झाली नवराई..पहा लग्नाचे खास क्षण
गेल्या अनेक दिवसांपासूुन मराठी इंडस्ट्रीत ज्या लग्नाची चर्चा होती त्या अक्षया आणि हार्दिकचं लग्न अखेर पुण्यात गुपचूप पार पडलं.
आता लग्नादिवशीचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नादिवशी सकाळी ज्या विधी होतात त्या या फोटोतून आपल्याला दिसत आहेत.
अक्षया मुंडावळ्या बांधून लग्नाला जाण्यासाठी सज्ज दिसतेय.
अक्षयाच्या लग्नात सगळ्या विधी अगदी पारंपरिक पद्धतीनं साजऱ्या करण्यात आल्या.
काही वर्षांपासून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर एकमेकांना डेट करत होते. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या सेटवर त्यांचे सूत जुळले.
पुण्यात आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराच्या सान्निध्यात लग्नसमारंभ आटोपल्यानंतर आता मुंबईत रीसेप्शन सोहळा पार पडणार आहे,ज्यात अनेक मराठी सेलिब्रिटी हजर असतील.
लग्नाच्या दिवशी सकाळी अक्षया देवधरनं सुंदर आकाशी रंगाच्या साडीत पारंपरिक दागिन्यांचा शृंगार केला होता.