क्रिकेट सामन्यादरम्यान व्यत्यय येणे हे अगदी सामान्य आहे. काही प्रसंगी मैदानाबाहेरील गोष्टींशी कारणीभूत असतात. सर्वात मजेदार आणि हृदयस्पर्शी कारण म्हणजे खेळाच्या दरम्यान मैदानावर प्राणी येणे आणि गेम खराब करणे. आयपीएलच्या काल झालेल्या सामन्यात बेंगलोर विरुद्ध पंजाबमध्ये असेच काहीचे घडले. त्यामुळे काही काळ मॅच थांबवाली. प्राण्यांमुळे सामने विस्कळीत झाल्याच्या काही घटना आहेत.
आयपीएलचा 60 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. बंगळुरूला या सामन्यात 54 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. काळ्या रंगाच मांजर चक्क मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये शिरलं.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 2010 च्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक कुत्र काही वेळ मैदानात आलं होत.
1983 मध्ये ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात एका प्रेक्षकांने मैदानात डुक्कर सोडल होत.
2015 च्या भारत-श्रीलंका मालिकेतील पहिल्या कसोटीत जिज्ञासू माकडाने अनपेक्षित खेळपट्टीवर आक्रमण केले होते, ज्यामुळे खेळ काही काळ रोखला गेला होता.
2013 साली इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या कसोटीदरम्यान मैदानात बदक आले होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.