शुभमंगल सावधान! माजी क्रिकेटपटू अरुण लाल अडकले लग्नबंधनात, 66 व्या वर्षी केलं दुसरं लग्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुभमंगल सावधान! माजी क्रिकेटपटू अरुण लाल अडकले लग्नबंधनात

Arun Lal Wedding

माजी क्रिकेटपटू अरुण लाल (Arun Lal) आज लग्नबंधनात अडकले आहेत. 66 वर्षीय अरुण लाल यांनी त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान असलेल्या बुलबुल साहासोबत (Bulbul Saha) लग्न केलंय.

Arun Lal Wedding : माजी क्रिकेटपटू अरुण लाल (Arun Lal) आज लग्नबंधनात अडकले आहेत. 66 वर्षीय अरुण लाल यांनी त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान असलेल्या बुलबुल साहासोबत  (Bulbul Saha) लग्न केलंय. अरुण लाल यांचं हे दुसरं लग्न असून कोलकात्यातील (Kolkata) एका कार्यक्रमात दोघांनी एकमेकांना साथ देण्याचं वचन घेतलंय.

अरुण लाल-बुलबुल साहाच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहेत. अरुण लाल आणि बुलबुल साहा लग्नाच्या कपड्यांत खूपच सुंदर दिसत आहेत.

कोलकात्यातील एका हॉटेलमध्ये झालेल्या या लग्नात अनेक माजी खेळाडूंनीही सहभाग घेतलाय. यात सबा करीमसह इतरांचा समावेश आहे.

लग्नाचा विधी पूर्ण झाल्यानंतर अरुण लाल यांनी पत्नी बुलबुलचं चुंबन घेतलं आणि दोघांनीही केक कापून हा क्षण साजरा केला.

अरुण लाल यांची नवी पत्नी बुलुबल साहा एक शाळेत शिक्षिका आहे, जी अजूनही शाळेत शिकवते. बुलबुल साहाला स्वयंपाकाची आवड आहे, तिनं 2019 मध्ये कुकिंग स्पर्धेतही भाग घेतला होता.

66 वर्षीय अरुण लाल यांचं हे दुसरं लग्न आहे. त्यांची पहिली पत्नी रीना हिच्यापासून त्यांचा घटस्फोट झालाय. रीनाची तब्येत अजूनही खूपच खराब आहे, अशा परिस्थितीत अरुण लाल हे दुसरं लग्न तिच्या इच्छेनुसारच करत आहेत.

टॅग्स :Cricket
go to top