sakal

बोलून बातमी शोधा

Asia Cup 2022 : चुरशीचा झाला! मात्र 'या' घटनांनी गालबोट लावलेच

Asia Cup 2022 Controversial incidence

Asia Cup 2022 Controversial Incidence : श्रीलंकेने जोरदार कमबॅक करत आशिया कप 2022 चे विजेतेपद मिळवले. यंदा टी 20 फॉरमॅटमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये अनेक सामने चुरशीचे झाले. मात्र खेळाडूंनी चुरशीच्या सामन्यावेळी आपले नियंत्रण गमावले. त्यामुळे यंदाचा आशिया कप दर्जेदार खेळासोबतच वादांनीही गाजला.

यंदाच्या आशिया कपमध्ये श्रीलंकेने पिछाडी भरून काढत विजेतेपदापर्यंत मुसंडी मारली. त्यांनी बांगलादेशचा पराभव करत सुपर 4 मध्ये प्रवेश केला. सामन्यापूर्वी बांगलादेशचे प्रशिक्षक आणि लंकेचा कर्णधार शानका यांच्यात शाब्दिक वॉर झाले. विजयानंतर लंकेच्या चमिरा करूणारत्नेने नागिन डान्स करत बांगलादेशला डिवचले.

असाच एक चुरशीचा सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर 4 मध्ये झाला. यावेळी अत्यंत महत्वाच्या क्षणी आसिफ अली बाद झाला. त्यानंतर अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद आणि आसिफ अली एकमेकांच्या अंगावर धावून गेले. आसिफ अलीने बॅट देखील उगारली.

या वादाचा पुढचा अंक प्रेक्षक गॅलरीत दिसला. सामना झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी पाकिस्तानच्या चाहत्यांना चांगलाच चोप दिला. या हाणामारीवेळी दुबईच्या स्टेडियममधील खुर्च्यांचा वापर करण्यात आला.

भारत - पाकिस्तान यांच्यातील सामन्यावेळी युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने मोक्याच्या क्षणी सोपा झेल सोडला. त्यानंतर तो संघाच्या बसकडे जात असताना त्याला एका व्यक्तीने गद्दार म्हणून संबोधले. हा वाद चांगलाच पेटला. यावेळी उपस्थित पत्रकार विमल कुमार अर्शदीपच्या समर्थनात पुढे आले. सोशल मीडियावरही आजी माजी खेळाडू आणि सेलिब्रेटींनी अर्शदीपचे समर्थन केले.

दरम्यान, श्रीलंका - पाकिस्तान अंतिम सामन्यावेळी भारतीय प्रेक्षकांना भारताची जर्सी घालून दुबईच्या स्टेडियममध्ये प्रवेश नाकारण्यात येत असल्याचा आरोप झाला.