Sat, Jan 28, 2023
बेळगावात कानडी आणि मराठी भाषिकांचा वाद चिघळला; पाहा फोटो
Published on : 17 December 2021, 5:57 pm
बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात शेकडो शिवभक्त जमा झाले असून उद्या 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात अभिषेक आणि घटनेचा निषेध करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात लाल-पिवळ्याची होळी केल्याचा बदला घेण्यासाठी कन्नडीगांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतला आहे. तसेच रंग ओतण्याचा व्हिडीओही व्हायरल केला आहे.
आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करुन तोडफोड केली आहे. या फोटोत आपल्याला पोलिसांच्या गाडीची काच फुटल्याचे दिसत आहे.
बेळगावातील संभाजी चौकात मोठ्या प्रमाणावर आंदोलक गोळा झाल्याने तणाव निर्माण झाला आहे.
धर्मवीर संभाजी चौकातील दगडफेकीच्या पार्श्वभुमीवर चौकाचौकात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
धर्मवीर संभाजी महाराज चौकात शेकडो शिवभक्त जमले असून त्यांनी कन्नडिगांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे.