sakal

बोलून बातमी शोधा

200 हुन अधिक वर्षांची परंपरा असणारी देवदादा सासनकाठी निघाली जोतिबा डोंगरावर

belguam

बेळगाव : जोतिबाच्या नावाने चांगभलं असा जय घोष करीत दोन वर्षांनंतर चव्हाट गल्लीतून सासन काठी तर नार्वेकर गल्लीतून जोतिबाची मूर्ती घेऊन भाविक यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर रवाना झाले असून यात्रेनिमित्त बेळगाव शहरातून हजारो भाविक रवाना होणार आहेत.

(संकलन- विजय मोहिते)

दरवर्षी चैत्र पोर्णिमेला ज्योतिबा देवाची यात्रा होते. या यात्रेनिमित्त चव्हाट गल्लीतून जाणाऱ्या देवदादा सासन काठीला 200 हुन अधिक वर्षांची परंपरा असून गुरुवारी रात्री जालगार मारुती मंदिर, देवघर व चव्हाटा मंदिर येथे विधिवत पूजन करून सासनकाठी रवाना झाली.

सासनकाठी बरोबर 100 हुन अधिक भाविक निघाले असून कटल्या (नंदी) सह 8 बैलजोड्या यामध्ये सहभागी झाल्या आहेत. देवदादा सासन काठी शुक्रवारी सकाळी हत्तरगी येथे पोहचणार असून याठिकाणी विश्रांती घेऊन सासनकाठी पुढे मार्गस्थ होणार आहे. तसेच पहिला मुक्काम संकेश्वर येथे असणार आहे.

नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान येथे पूजन करून गुलालाच्या उधळणीत कटल्यासह ज्योतिबाची मूर्ती घेऊन भक्त पायी चालत डोंगराकडे रवाना झाले आहेत. तसेच हेब्बाळ, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर येथे वस्ती करून मंगळवारी ( ता. 12 ) एप्रिल रोजी जोतिबा डोंगरावर पोचणार आहे.

शुक्रवार (ता. 15) रात्री दवणा आणि शनिवार 16 एप्रिल रोजी पालखी (सबीणा )सोहळा होणार आहे. त्यानंतर गुरुवार (ता. 21) एप्रिल रोजी कोल्हापूर सर्कल बेळगाव येथे आंबील, घुगऱ्याची जत्रा करून पालखी नार्वेकर गल्ली बेळगाव येथे पोहोचणार आहे. याची बेळगाव परिसरातील सर्व जोतिबा भक्तांनी नोंद घ्यावी असे मंदिरातर्फे कळविण्यात आले आहे.

शुक्रवार (ता. 15) रात्री दवणा आणि शनिवार 16 एप्रिल रोजी पालखी (सबीणा )सोहळा होणार आहे. त्यानंतर गुरुवार (ता. 21) एप्रिल रोजी कोल्हापूर सर्कल बेळगाव येथे आंबील, घुगऱ्याची जत्रा करून पालखी नार्वेकर गल्ली बेळगाव येथे पोहोचणार आहे. याची बेळगाव परिसरातील सर्व जोतिबा भक्तांनी नोंद घ्यावी असे मंदिरातर्फे कळविण्यात आले आहे.

सासनकाठी बरोबर 100 हुन अधिक भाविक निघाले असून कटल्या (नंदी) सह 8 बैलजोड्या यामध्ये सहभागी झाल्या आहेत. देवदादा सासन काठी शुक्रवारी सकाळी हत्तरगी येथे पोहचणार असून याठिकाणी विश्रांती घेऊन सासनकाठी पुढे मार्गस्थ होणार आहे. तसेच पहिला मुक्काम संकेश्वर येथे असणार आहे.

सासनकाठी बरोबर 100 हुन अधिक भाविक निघाले असून कटल्या (नंदी) सह 8 बैलजोड्या यामध्ये सहभागी झाल्या आहेत. देवदादा सासन काठी शुक्रवारी सकाळी हत्तरगी येथे पोहचणार असून याठिकाणी विश्रांती घेऊन सासनकाठी पुढे मार्गस्थ होणार आहे. तसेच पहिला मुक्काम संकेश्वर येथे असणार आहे.

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त बेळगाव शहर आणि परिसरातील हजारो भाविक पुढील गुरुवारपासून डोंगरावर रवाना होणार आहेत. दोन वर्षे यात्रेच्यावेळी भाविकांना डोंगरावर पोहचता आले नव्हते. त्यामुळे यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :KarnatakaBelguam