Photo Story: उन्हाळ्याच्या सुट्टीत विदेशात जायचा प्लॅन करताय? या 5 ठिकाणांना भेट द्या | Summer Destinations Outside India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्हाळ्याच्या सुट्टीत विदेशात जायचा प्लॅन करताय? या 5 ठिकाणांना भेट द्या

Best Summer Destinations Outside India

Best Summer Destinations Outside India: या उन्हाळ्याच्या सुट्टीत परदेशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर आजआम्ही तुम्हाला जगभरातील 5 सर्वोत्तम ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. ही ठिकाणं बजेट फ्रेंडली तर आहेतच, शिवाय जोडप्यांसाठी तसेच मुलांसोबत भेट देण्यासाठीही उत्तम आहेत. जाणून घेऊया या खास ठिकाणांबद्दल...

1) नेपाळ- नेपाळ भारताचा शेजारी देश आहे. चीन आणि भारताच्या सीमेवरील हा देश भारतीय जोडप्यांसाठी स्वस्तात मस्त पर्याय आहे. इतर देशांपेक्षा नेपाळमध्ये जेवणापासून ते राहण्यापर्यंत सर्व काही स्वस्त आहे. तुम्ही येथे बर्फाच्छादित शिखरे, सुंदर नद्या, उत्कृष्ट दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

२) थायलंड- थायलंडला दरवर्षी अनेक भारतीय भेट देत असतात. मे महिन्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून थायलंड ओळखले जाते. थायलंडमधील सुंदर दृश्ये, मंदिरे आणि अनेक ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. याशिवाय तुम्ही बीचवर पार्टीचा आनंद घेऊ शकता.

3) सिंगापूर- परवडणाऱ्या दरात परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी सिंगापूर हे उत्तम ठिकाण आहे. हा एक वैविध्यपूर्ण देश आहे. इथे तुम्ही मर्यादित बजेटमध्ये भेट देऊ शकता. जर तुम्हाला आधुनिक इमारती, आलिशान शॉपिंग मॉल्स आणि काही रोमांचक गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल, तर हे ठिकाण सर्वोत्तम आहे. तुम्ही मुलांसोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सिंगापूरला जाण्याचा विचार करू शकता.

4) मलेशिया- हे पर्यटकांसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. सुंदर शहरे, आकर्षक पर्वत आणि बेटे यांमुळे मलेशिया हा देश पर्यटकांच्या आवडीचा देश आहे. तुम्ही येथे ट्रेकिंग, वॉटरस्पोर्ट्ससारख्या उपक्रमांचा आनंद घेऊ शकता.

5) मालदीव- मे, जून, जुलैमध्ये भारताबाहेर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मालदीवला जाता येते. मालदीव हे जोडप्यांसाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. ज्यांना वॉटरस्पोर्ट्सची आवड आहे, अशा लोकांसाठी मालदीव सर्वोत्तम ठिकाण आहे. तुम्ही आपल्या मुलांसोबत तिथे जाऊ शकता.

go to top