गुजराती आणि राजस्थानचे लोक मुंबईतून (Mumbai) निघून गेल्यास मुंबईत काय उरेल? असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलं होतं. त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी आणि मनसेनं या विधानावरून राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत. तर, शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांवर टीका करतानाच शिंदेगट आणि भाजपची कान उघाडणी केलीय. आत्ताच नाही तर या आधीही त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.
औरंगाबादमध्ये 27 फेब्रुवारी रोजी श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले ‘चाण्याक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालयं. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले, या राज्याची चावी मी तुम्हाला देतो. त्यावर समर्थ म्हणाले, ही राज्याची चावी मला कुठे देता, तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं.
2 मार्च ला पुण्यात कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, कल्पना करा की सावित्रीबाईंचं लग्न 10 वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील… लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील… एक प्रकारे तो कालखंड मुर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं होतं.
गुजराती आणि राजस्थानी मुंबईतून निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी ठाण्यात केलं आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.