sakal

बोलून बातमी शोधा

विशाल निकम जिंकणार 'बिग बॉस मराठी ३'ची ट्रॉफी?

Vishal Nikam, Bigg Boss Marathi 3

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी ३' सध्या अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच या सिझनचा विजेता घोषित होणार आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी ग्रँड फिनाले पार पडणार असून आतापर्यंतच्या प्रवासात विशाल निकमला तगडा स्पर्धक मानलं जातंय.

विशालने बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासूनच सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. 'तिकिट टू फिनाले'चं टास्क जिंकत विशालने ग्रँड फिनालेमध्ये आपलं स्थान पक्कं केलंय. इथपर्यंतचा त्याचा प्रवास अनेक चढउतारांचा होता. यामध्ये त्याला बिग बॉसकडून शिक्षासुद्धा भोगावी लागली आणि सर्वाधिक वेळा तो नॉमिनेशनच्या पिंजऱ्यात उभा होता.

बिग बॉसच्या घरात १०० दिवस टिकून राहणार, असं वचन सूत्रसंचालक महेश मांजेरकरांना देऊन विशालने घरात पाऊल ठेवलं. 'तिकिट टू फिनाले' जिंकत त्याने त्याचं वचन पूर्ण केलं आहे.

बिग बॉसच्या घरात विकास पाटील हा विशालचा पहिला मित्र बनला. बिग बॉसच्या घरातच दोघांची पहिल्यांदा भेट झाली. स्पर्धा जिंकण्यासाठी एकमेकांसोबत प्लॅनिंग करण्यापासून एकमेकांसाठी टक्कल करण्यापर्यंत ही जोडी सोशल मीडियावर तुफान चर्चेत राहिली.

प्रत्येक टास्कदरम्यान त्याची खेळी घरात आणि घराबाहेर चर्चेत राहिली. यादरम्यान त्याचं जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे यांच्यासोबत भांडणसुद्धा झालं. यामुळेच त्याला बिग बॉसकडून अनेकदा तुरुंगात पाठवलं गेलं.

घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकांच्या नॉमिनेशन प्रक्रियेत अनेकदा विशाल निकमचं नाव पहायला मिळालं. सर्वाधिक वेळा नॉमिनेशन झालेल्या स्पर्धकांपैकी तो एक आहे. इतकंच नव्हे तर घरातील सामानाचं नुकसान केल्यामुळे बिग बॉसने त्याला अनेकदा थेट नॉमिनेट केलं आहे.

विशाल आणि सोनाली पाटील यांची मैत्रीसुद्धा बिग बॉसच्या घरात गाजली. ही जोडी चाहत्यांमध्येही खूप चर्चेत आहे.