बिपाशा बासू सिंग ग्रोव्हर (Bipasha Basu Singh Grover)(जन्म ७ जानेवारी १९७९)[३] एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल (Model) आहे. मुख्यतः हिंदी चित्रपटांमधील तिच्या कामासाठी ओळखली जाणारी, ती तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे.
ती एका फिल्मफेअर (Filmfare) पुरस्कारासह अनेक पुरस्कारांची मानकरी आहे. विशेषतः थ्रिलर (Thriller) आणि हॉरर (Horror) चित्रपट शैलीतील तिच्या कामासाठी ती ओळखली जाते.
दिल्लीत (Delhi) जन्मलेल्या आणि कोलकाता (Kolkata)येथे वाढलेल्या बिपाशाने 1996 मध्ये गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल (Godrej Cinthol Supermodel)स्पर्धा जिंकली आणि नंतर फॅशन मॉडेल (Fashion Model) म्हणून यशस्वी कारकीर्द सुरू केली.
बिपाशाची पहिली प्रमुख भूमिका ब्लॉकबस्टर (Blockbaster)हॉरर फिल्म राझ (2002) (Raaz) मध्ये होती, ज्याने तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवून दिले. त्यानंतर 2003 च्या थ्रिलर चित्रपट जिस्म (Jism) आणि 2006 ड्रामा कॉर्पोरेट मधील तिच्या मोहक भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले.
ख्यातनाम जोडपे बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) यांनी 2016 मध्ये एकमेकांशी लग्न केले. सोशल मीडियावर (Social Media)त्यांच्या प्रेमळ क्षणांचे फोटोज ते सतत टाकत असतात.
नो एंट्री (No entry 2005), फिर हेरा फेरी (Fir Hera Pheri 2006), ऑल द बेस्ट: फन बिगिन्स (All the Best:Fun Begins 2009), धूम 2 (dhoom-2 2006), रेस (Race 2008), बचना ए हसीनो (Bachma Yeh Haseeno 2008), आत्मा (Atma 2013), क्रिएचर 3D (Creature3D 2014) आणि अलोन (Alone 2015) या भयपट चित्रपटांमधील तिच्या अभिनयासाठी तिला प्रशंसा मिळाली. तिच्या इतर उल्लेखनीय कामांमध्ये अनेक चित्रपटांमधील आयटम नंबरचा समावेश आहे. 2021 मध्ये, अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत 20 वर्षे पूर्ण केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.