Bollywood Actress: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा (Sonakshi Sinha) नवा अवतार आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसूनव आले आहे. सोनाक्षी (Bollywood Actress) ही नेहमीच तिच्या बोल्ड आणि हॉट लूकसाठी ओळखली (Entertainment News) जाणारी अभिनेत्री आहे. तिनं समुद्रकिनाऱ्यावरील तिच्या फोटोशुटमधून चाहत्यांना आगळी वेगळी ट्रीट दिली आहे. येत्या काळात सोनाक्षी वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून चाहत्यांसमोर येणार आहे. ती सध्या मालदीवमध्ये (Maldive Photoसुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहे. सोनाक्षीचा तो किनाऱ्यावरील हॉट लूक पाहून नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट कमेंट्सही दिल्या आहेत.
सोनाक्षीनं मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी बोल्ड फोटोशुट केलंय. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नेटकऱ्यांनी त्या फोटोंचे कौतूक केले आहे.
सोनाक्षीनं ते फोटो शेयर करताना त्याला कॅप्शनही दिली आहे. त्यामध्ये ती म्हणते आता डाईव्ह टाईम आहे. मी सध्या मालदीवमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे. हा सगळ्यात आनंददायी क्षण आहे.
सोनाक्षी लिहिते, मालदीव हा काही सिक्रेट विषय नाही. याठिकाणी येणं, या निसर्गाचा आनंद घेणे खूप समाधान देणारे आहे. मी नेहमीच मालदीवला भेट देते. त्याची अपुर्वाई ही काही वेगळीच असते.
हटक्या स्टाईलसाठी सोनाक्षीनं फोटोशुट केलं आहे. त्यावरुन तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काहींनी तिला नेहमीप्रमाणे सुंदर आणि हॉट दिसते आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.