sakal

बोलून बातमी शोधा

'या' 9 सेलिब्रिटींचं आपल्या धर्मगुरुंशिवाय पानही हालत नाही..जाणून घ्या कोण आहे कोणाचा अनुयायी..

Shilpa Shetty, Hrithik Roshan, Anushka Sharma

अनेक बॉलीवूड स्टार्स आहेत ज्यांची देवावर,धार्मिक चाली-रितींवर नितांत श्रद्धा आहे. सिनेमाच्या रिलीज आधी देखील अनेक जण मंदिरात आणि अजमेर शरीफच्या दर्ग्यात जाऊन माथा टेकताना दिसतात. चला आज काही अशा स्टार्सच्या बाबतीत जाणून घेऊया ज्यांची देवावर आणि आपल्या धर्मगुरुंवर खूप श्रद्धा आहे.

राधे मां सोबत आपला फोटो व्हायरल झाल्यावर सुभाष घई यांच्या बाबतीत अनेक  उलट सुलट गोष्टी बोलल्या गेल्या. कारण त्यावेळी राधे मां वर देखील अनेक आरोप होत होते. पण यामुळे लोकांचा विश्वास राधे मां यांच्यावरनं उडाला नाही..ना सुभाष घई यांची राधे मां वरील श्रद्धा कमी झाली.

शिल्पा शेट्टीचा वननेस युनिव्हर्सिटीवर दृढ विश्वास ठेवण्याआधी द आर्ट ऑफ लिव्हिंगवर ठाम विश्नास होता.

हृतिक रोशन देखील वननेस युनिव्हर्सिटीवर दृढ विश्वास ठेवतो. तो नेहमीच म्हणताना दिसतो की,तो आता जीवनात खूप शांत,समाधानी आणि खूश आहे.  काही वर्ष आधी वननेस विश्वविद्यालय देखील सार्वजनिक संपत्तीचा दुरूपयोग केल्यामुळे चर्चेत आलं होतं. तेव्हा या प्रकरणाचा खोलवर तपास झाला होता.

लारा दत्ताने केवळ रविशंकर यांच्या अध्यात्मिक प्रवचनांचा आनंद घेतला नाही तर २००८ मध्ये ती रविशंकर यांच्या फाऊंडेशनमध्ये प्रशिक्षक देखील बनली होती. तिनं अनेक देशात युवा सेवा योजनांचा शुभारंग या माध्यमातून केला.

महेश भट्ट श्री रजनिश यांचे अनुयायी आहेत. त्यांनी अनेकदा त्यांच्या आश्रमाला भेट दिली आहे.  पुण्यातील हे आश्रम देखील काही कारणांमुळे वादात आलं होतं.

विराट आणि अनुष्का शर्मा यांना काही दिवस आधी वृंदावन आश्रमात पाहिलं गेलं होतं. ते तिकडे आपल्या धर्मगुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी आपली मुलगी वमिका हिला घेऊन गेले होते.

शाहिद कपूर आणि त्याचे वडील पंकज कपूर राधा स्वामी यांचे अनुयायी आहेत. शाहिदला आपली पत्नी मीरा देखील सत्संगामध्येच भेटली. राधास्वामी यांचा सत्संगही वादात अडकला होता.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात फसल्यानंतर अडचणीत सापडली होती. त्यानंतर ती दिल्ली मध्ये गुरुजी निर्मल सिंग यांच्या दर्शनसाठी गेली होती. जॅकलिनच्या गुरुंनी तिला एक ब्रेसलेटही भेट दिले होते.