Bollywood Top 10 : अमिताभ, शाहरुख, सलमान कोणीच नाही! आहे तरी कोण? |Bollywood top 10 Actor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Top 10 : अमिताभ, शाहरुख, सलमान कोणीच नाही! आहे तरी कोण?

Bollywood Top 10 celebrity

Bollywood News: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा (Bollywood Actor) येतात ती अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान यांची नावे (Entertainment News) समोर येतात. महानायक अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता तर वयाच्या 80 व्या वर्षीही कायम आहे. त्यांच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. आता (Amitabh bachchan) मात्र आपण बॉलीवूडमधील अशा टॉप टेन सेलिब्रेटींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांच्याबद्दल चाहत्यांना फारशी काही माहिती नाही. त्यांचे चित्रपट प्रेक्षकांनी पाहिले आहेत मात्र त्यांच्या नावावर असणारी विक्रमी कामगिरी त्यांना माहिती नाही. काही ठराविक नावं सोडल्यास अनेकांना बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सेलिब्रेटींविषयी आपण जाणून घेणार आहोत. अनेकांना त्या यादीमध्ये सलमान, शाहरुख, आमीर यांचे नाव नसल्यानं आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

अरुणा ईरानी -  अरुणा ईरानी यांच्या नावावर 500 हून अधिक चित्रपटांची नोंद असल्याचे सांगितले जाते. त्यांनी कन्नड, गुजराती, मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका पार पाडली आहे.

मिथुन चक्रवर्ती - आता मिथुन चक्रवर्ती यांचे वय 71 वर्षे आहे. त्यांनी 1976 मध्ये बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. डिस्को डान्सर म्हणून मिथुन लोकप्रिय होते. त्यांचा नुकताच द काश्मीर फाईल्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

कादर खान -  विनोदी अभिनेता कादर यांच्याविषयी अनेकांना माहिती आहे. या अभिनेत्याला त्यांच्या अखेरच्या काळात मोठ्या संकंटांना सामोरं जावं लागलं होतं. केवळ अभिनयच नाहीतर संवाद लेखन, स्क्रिप्ट लेखन यामध्ये देखील त्यांचा हातखंडा होता. त्यांनी देखील तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.

श्रीदेवी - बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा फॅन क्लब मोठा होता. तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या श्रीदेवी यांची लोकप्रियताही मोठी होती. त्यांचे जाणे प्रेक्षकांना चटका लावून गेले.

अमरिश पुरी - बॉलीवूडमधील सर्वात गाजलेले व्हिलन म्हणून अमरीश पुरी यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांचे काम अजुनही प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांना निखळ आनंद दिला. त्यांनी 450 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.

ओमपुरी - दिसण्यामुळे नाहीतर अभिनयामुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते म्हणून ओम पुरी यांचे नाव घेता येईल. त्यांनी दोन दशके आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. तिनं 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

अनुपम खेर - तब्बल पाचशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करण्याची किमया अनुपम खेर यांनी केली आहे. ते अजुनही बॉलीवूडमध्ये सक्रिय असणारे अभिनेते आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या द काश्मीर फाईल्समधील त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते.

शक्ति कपूर -  तुम्हाला कदाचित शक्ति कपूर यांचे नाव ऐकल्यावर धक्का बसेल. मात्र या यादीमध्ये त्यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.  त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. क्राईम, कॉमेडी, ऐतिहासिक, चरित्र अभिनेता म्हणूनही त्यांनी भूमिका केल्या आहेत.

ललिता पवार - टॉप यादीमध्ये ललिता पवार यांचा क्रमांक फार वरचा आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील फर्स्ट लेडी म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी हिंदीसोबतच गुजराती, मराठी चित्रपटांमध्ये वयाच्या नवव्या वर्षांपासून काम केले आहे.

धर्मेंद्र - बॉलीवूडमध्ये 50 वर्षांहून अधिक काळ ज्या अभिनेत्याची दहशत आहे त्यामध्ये धर्मेंद्र यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी तीनशे हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. बॉलीवूडचे हि मॅन म्हणून त्यांना लोकप्रियता मिळाल्याचे दिसुन आले.

go to top