sakal

बोलून बातमी शोधा

Chandni Chowk Bridge: अखेर चांदणी चौकातील पूल अखेर इतिहासजमा, येथे पाहा PHOTOS

Chandni Chowk Bridge
वाहतूक कोंडीचे  कारण ठरलेला चांदणी चौकातील पूल अखेर शनिवारी मध्यरात्री एक वाजता पाडण्यात आला. नोएडा येथील ट्वीन टॉवर पाडलेल्या एडिफीस इंजिनिअरिंग कंपनीने ६०० किलोंचे विस्फोटक वापरून हा पूल पाडला.

चांदणी चौकातील हा पूल पाडण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून नियोजन करण्यात येत होते, दरम्यान पूल पाडल्यानंतर लगेच रस्ता मोकळा करण्याच्या कामाला युध्दपातळीवर सुरूवात करण्यात आली.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीविषयी नागरिकांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी करुन या पूलाच्या पाडकामाबाबत आदेश दिले होते.

पूल पाडताना दगड व माती उडू नये, यासाठी संपूर्ण पूल पांढऱ्या कपड्याने झाकला होता. त्यामुळे दगडाचे तुकडे इतरत्र फेकले गेले नाही. मात्र, धुळीचे लोट मोठ्या प्रमाणात उडाले.

दरम्यान हा पूल पाडण्यापूर्वी प्रशासनाने शनिवारी सायंकाळपासूनच वाहतुकीत मोठा बदल  केले होते. तसेच जिल्हा प्रशासनाने पूलाच्या परिसरात कलम १४४ लागू करत खबरदारीचे उपाय केले होते.

पुलाजवळचा २०० मीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला. रात्री अकरापासून या भागातील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली व परिसरात बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी ४२३ पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती.

तसेच या प्रक्रियेदरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास वैद्यकीय सेवा देण्यात यावी या दृष्टीने देखील तयारी करण्यात आली होती, त्यासाठी रुग्णवाहीका तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.

३० वर्षे जुना हा पूल.मध्यरात्रीनंतर बरोबर १ वाजता स्फोट करण्यात आले, यानंतर आकाशत धूळीते लोट उडाले. त्यानंतर काही वेळाने पुलाची पाहणी करण्यात आली तसेच उरलेला भाग पोकलेनच्या मदतीने पाडण्यात आला.

पूल पाडण्यात आम्ही १०० टक्के यशस्वी झालो आहोत अशी माहिती उत्कर्ष मेहता, एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीचे पार्टनर यांनी दिली आहे. तसेच सकाळी ८  वाजण्याच्या आधीच आमचे काम पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे सकाळी आठ वाजेपर्यंत रस्ता वाहतूकीसाठी मोकळा होण्याची शक्यता आहे.