चेन्नई सुपर किंग्जच्या सलामीवीरानं गर्लफ्रेंडशी केलं लग्न, फोटो व्हायरल I Chennai Super Kings | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेन्नई सुपर किंग्जच्या सलामीवीरानं गर्लफ्रेंडशी केलं लग्न, फोटो व्हायरल

Wedding photo of Devon Conway and Kim Watson goes viral

चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सलामीवीर डेव्हन कॉनवेनं (Devon Conway) गर्लफ्रेंड किम वॉटसनसोबत (Girlfriend Kim Watson) नुकतंच लग्न केलंय.

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सलामीवीर डेव्हन कॉनवेनं (Devon Conway) गर्लफ्रेंड किम वॉटसनसोबत (Girlfriend Kim Watson) नुकतंच लग्न केलंय. अलीकडंच तो त्याच्या लग्नासाठी आयपीएलच्या 2022 बायो बबलमधून बाहेर पडलाय. बायो बबलमधून बाहेर आल्यानंतर, कॉनवे एका खास प्रसंगासाठी त्याचा मूळ देश असलेल्या दक्षिण आफ्रिकेत पोहोचलाय.

आता डेव्हनच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार, कॉनवे आणि किम दोघंही गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

कॉनवेनं बायो बबल सोडण्यापूर्वी CSK नं तिच्यासाठी एक पारंपरिक प्री-वेडिंग पार्टी आयोजित केली होती.

कॉनवेच्या आयपीएल (IPL) प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर हा त्याचा पहिलाच सीझन आहे. त्याला चेन्नईनं मेगा लिलावात 1 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतलंय.

कॉनवेला सीएसकेकडून फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये तो केवळ 3 धावा करू शकला. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यासाठी कॉनवे उपलब्ध होणार नाहीय. संघात सामील झाल्यानंतर, त्याला 3 दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे.

go to top