Photos: चीन दाखवतोय 'चुमी ग्यात्से'वर हक्क, काय आहे नेमका या Waterfallचा इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photos: चीन दाखवतोय 'चुमी ग्यात्से'वर हक्क, काय आहे नेमका या Waterfallचा इतिहास

चुमी ग्यात्से

यांगत्से क्षेत्राजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) अवघ्या २५० मीटर अंतरावर भारताच्या हद्दीत असलेल्या 'होली वॉटर फॉल' अर्थात पवित्र पाण्याच्या धबधब्यावर चीन आपला हक्क असल्याचा दावा करत आहे. नेमका या धबधब्याचा इतिहास काय, आज आपण जाणून घेणार आहोत.

सुमारे ११ हजार फूट उंचीवरून या धबधब्याचे उगम असलेल्या या धबधब्याला पवित्र स्थळ मानले जाते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ८ व्या शतकातील बौद्ध धर्मगुरू आणि तिबेटी बौद्ध धर्माचे जनक गुरू पद्मसंभव यांना येथे पसरलेल्या महामारीपासून स्थानिकांना वाचवण्यासाठी आपल्या जपमाळेतील या शिखराच्या खडकावर फेकली. यामुळे येथे १०८ झरे तयार झाले.

या झऱ्याला एकत्रितपणे 'चुमी ग्यात्से' (पवित्र पाणी) धबधबा तयार झाला. अनेक भाविक या ठिकाणी येतात व छोटे छोटे लामा ध्वज बांधत प्रार्थना करतात.

चीन आणि अरुणाचल प्रदेशच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाचे सीमांकन करणाऱ्या मॅकमोहन रेषेवरील विवादित स्थळापैकी हे एक आहे. मात्र हा धबधबा भारताच्या हद्दीत असून आपल्या सीमेच्या आत येण्यापासून चीनला रोखण्याची जबाबदारी सैन्यदल पार पाडत आहे.

गुरु पद्मसंभव यांचा जन्म तिबेटमध्ये झाल्याचा दावा चीनद्वारे केला जात आहे. या स्थळाची माहिती मिळावी यासाठी चीन या भागावर पाळत ठेवण्यासाठी कॅमेराचा ही वापर करत असल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.

एलएसीच्या जवळ हे स्थळ असल्याने येथे लष्कराच्या तुकड्या तैनात आहेत. मात्र पर्यटकांना भेट देण्यासाठी येथे बंधन नसून त्यांच्या सुरक्षिततेची काळजी देखील घेतली जात आहे. 

go to top