Christmas Tree Decorating Ideas: ख्रिसमस ट्री डेकोरेट करण्याच्या भन्नाट आयडिया
ख्रिसमससाठी मुले खूप उत्सुक असतात. असे मानले जाते की या दिवशी सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू आणतात. मुले सांताक्लॉजची वाट पाहत असतात. हिवाळी सुट्ट्या या दिवसापासून सुरू होतात, म्हणूनच मुले 25 डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत असतात.त्यामुळे तुम्ही देखील ख्रिसमस ट्री घरी आणून आपल्या मनाप्रमाणे त्याची सजावट करू शकता. आजकाल बाजारात सजावटीचे सामान सहज मिळते. घरी छान ख्रिसमस ट्री आणून उपलब्ध असणाऱ्या साहित्यात तुम्ही सजावट कशी करू शकता याबद्दलची माहिती आपण या लेखातून जाणून घेऊया ...
चॉकलेट वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट वापरून तुम्ही ख्रिसमस ट्री सजवू शकता.
लाईटच्या माळा - बाजारात विविध रंगांच्या व आकाराच्या लाईटच्या माळा उपलब्ध असतात. या माळा तुम्ही ख्रिसमस ट्री वरून सोडू शकता किंवा झाडाच्या आकारात गोल गुंफू शकता. या रोषणाईने तुमचा ख्रिसमस ट्री उठून दिसेल.
रिबन्स मुख्यत्वे करून सोनेरी आणि लाल रंगांच्या रिबन्सचा वापर ख्रिसमस ट्री सजविण्यासाठी केला जातो. ख्रिसमस ट्रीच्या फांद्यांना या रिबन्स गुंडाळून डिझाईन तयार केल्यास फांद्या अधिक आकर्षक दिसतात.
बेल्स - रंगीबेरंगी व चमकदार बेल्सचा वापर केल्यास ख्रिसमस ट्रीच्या सजावटीत अधिक भर पडेल.
छोट्या भेटवस्तूंचा बॉक्स - या सणाला एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. बाजारातून विविध भेटवस्तू आणून ख्रिसमस ट्रीच्या अवतीभवती त्या मांडून त्याची शोभा वाढवू शकता
स्टार - ख्रिसमस ट्रीची सजावट स्टार शिवाय अधुरी आहे. लाल, सोनेरी, पिंक अश्या विविध रंगांचे प्लास्टिकचे स्टार बाजारात उपलब्ध आहेत.
लहान टॉय - ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी छोटया - छोट्या टॉईजचा वापर करु शकता. छोटा सांताक्लॉज, मिकी माऊस, टेडी बेअर हे प्रत्येक फांदीवर लटकवू शकता. त्यामुळे फांद्यांना छान लूक येईल.
कापूस - तुमच्या ख्रिसमस ट्री वर बर्फ पडला हे दाखवायचे असेल तर कापसाचा वापर तुम्ही करू शकता.