- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
PHOTO : योगींच्या राज्याभिषेकासाठी लखनौ झालं भगवंमय

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आज इकना स्टेडियमवर (Ekana Stadium) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत काही मंत्रीही शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा दुपारी 4 वाजता होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह (Narendra Modi) सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

शपथविधी सोहळ्यापूर्वी राजधानी लखनौमध्ये भाजप (BJP) कार्यकर्त्यांची लगबग सुरू झालीय. कोणी भजन करत आहे, तर कोणी गाणी गाऊन या सोहळ्याचा आनंद लुटत आहे.

लखनौच्या इकना स्टेडियममध्ये स्टेजही सजवण्यात आलाय. तर, शेतात कमळाच्या फुलाची रांगोळी काढण्यात आलीय. स्टेजच्या अगदी खाली कमळाच्या फुलांची रांगोळी काढण्यात आली आहे. तसंच पीएम मोदींचे कटआउट्स लावण्यात आले आहेत. दरम्यान, मैदानात ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं जाणार आहे.

शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाजपचे कार्यकर्ते लखनौला पोहोचू लागले आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची पुरती व्यवस्थाही करण्यात आलीय. भाजप कार्यालयात दोन हजारांहून अधिक कार्यकर्त्यांसाठी पुरणपोळी, भाजीपाला आणि मिठाईची व्यवस्था केली जात आहे.

गोरखपूरच्या गोरक्षनाथ मंदिरात (Goraksanath Temple) आज विशेष व्यवस्था करण्यात आलीय.

दुपारी 3 वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असून लोकगायक राकेश श्रीवास्तव लोकगीते व भजने सादर करणार आहेत. शपथविधीनंतर फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाईचे वाटप होणार आहे.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.