Commonwealth Games : राष्ट्रकुल स्पर्धेत 'हे' भारतीय बॉक्सर असतील पदकाचे प्रबळ दावेदार| Commonwealth Games indian boxing contingent at commonwealth games 2022 squad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Commonwealth Games : राष्ट्रकुल स्पर्धेत 'हे' भारतीय बॉक्सर असतील पदकाचे प्रबळ दावेदार

Commonwealth Games indian boxing

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय बॉक्सर रिंगमध्ये उतणार आहेत. अमित पंघाल टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील निराशा विसरून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. तर लोव्हलिना बोरगोहेन जागतिक स्पर्धेतील खराब कामगिरी विसरेल. विशेष म्हणजे सर्वांच्या नजरा गतविजेत्या निखत झरीनवर असतील.

भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत देशाला एकमेव सुवर्णपदक जिंकून दिले. निखत 52 किलोवर खेळली आहे. पण कॉमनवेल्थ स्पर्धेत 50 किलोमध्ये भाग घ्यावा लागणार आहे.

 टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या बॉक्सिंगमध्ये भारताच्या लव्हलिन बोर्गोहेनचा उपांत्य फेरीत पराभव झाल्याने तिला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा कांस्यपदक जिंकणारी लव्हलिना कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करेल अशी अपेक्षा क्रिडा जगात करण्यात येत आहे.

अमित पंघालने अखेरचे गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तो ऑलिम्पिकमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता पण त्याला उपउपांत्यपूर्व फेरीवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर पंघालने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला नाही. त्याने थायलंड ओपनमध्ये पुनरागमन केले जेथे त्याला रौप्य पदक जिंकण्यात यश आले. राष्ट्रकुल स्पर्धेतही तो पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

अनुभवी शिव थापा (63.5 किलो) देखील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक आपल्या नावावर नोंदवू इच्छितो. 28 वर्षीय बॉक्सरच्या नावावर पाच आशियाई चॅम्पियनशिप पदके आहेत. गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये तो सहभागी झाला नव्हता. ऑलिंपियन आशिष कुमार (80 किलो), गेल्या वेळचा कांस्यपदक विजेता मोहम्मद हुसामुद्दीन (57 किलो) आणि आशियाई चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेता संजीत (+92 किलो) हे देखील विजेतेपदाचे दावेदार आहेत.

रोहित टोकस (67 किलो), सुमित कुंडू (75 किलो), आणि सागर (+92 किलो) यांना कमी अनुभव आहे परंतु त्यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे. या सामन्यांचे दडपण ते कसे हाताळतात हे पाहणे उत्सुकत्याचे ठरेल. महिला विभागात, दिग्गज एमसी मेरी कोमच्या अनुपस्थितीत, सर्व आशा लव्हलिना आणि निखत यांच्यावर असतील.

टॅग्स :Indian Boxing Team