पुणे : लोणावळा येथील आयएनएस शिवाजीतील संस्थेतील ‘संयुक्त कर्मचारी प्रशिक्षणार्थी अभ्यासक्रमा’च्या (मर्ज आर्टिफिसर अॅप्रेंटिस कोर्स - एमएएसी) ३२ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा शुक्रवारी (ता. ६) संपन्न झाला.
प्रशिक्षण पूर्ण केलेले एकूण १५२ प्रशिक्षणार्थी
भारतीय नौदल ः १३९
तटरक्षक दल ः ३
मित्र देशातील ः १०
यामध्ये १५२ प्रशिक्षणार्थ्यांनी ११७ आठवड्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.
पुणे : लोणावळा येथील आयएनएस शिवाजीतील संस्थेतील ‘संयुक्त कर्मचारी प्रशिक्षणार्थी अभ्यासक्रमा’च्या (मर्ज आर्टिफिसर अॅप्रेंटिस कोर्स - एमएएसी) ३२ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा शुक्रवारी (ता. ६) संपन्न झाला. यामध्ये १५२ प्रशिक्षणार्थ्यांनी ११७ आठवड्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.
आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर अरविंद रावल यांनी यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला.या अभ्यासक्रमात भारतीय नौदल, तटरक्षक दलाबरोबर श्रीलंका, नायजेरिया, मॉरिशस व टांझानिया या मित्र देशातील प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता.
यामध्ये शेषागिरी दीसेट्टी याने ८८. २८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर आशुतोष करजी याला ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ म्हणून ‘कमोडोर रोलिंग ट्रॉफी’ देण्यात आली.
कोरोनामुळे प्रशिक्षणादरम्यान अनेक निर्बंध आले असतानाही, प्रशिक्षणार्थ्यांनी डिझेल इंजिन, गॅस टर्बाइन अशा विविध उपकरणांचे प्रशिक्षण घेतले. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थ्यांनी विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, शिबिरांमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमात प्रशिक्षणा दरम्यान उत्तीर्ण कामगिरी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा सन्मान कमोडोर रावल यांच्या हस्ते करण्यात आला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.