Cristiano Ronaldo: तुमच्या दहा पिढ्यांना पुरेल एवढं क्रिस्तियानोच्या घराचं एका महिन्याचं भाडं, किंमत...
फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो सौदी अरबच्या अल-नासर फुटबॉल क्लबमध्ये सामील झालाय. दरवर्षी त्याला याचे 200 मिलियन युरो म्हणजेच सुमारे 1700 कोटी रुपये मिळतील.
प्रसिद्ध फुटबॉलर क्रिस्तियानो रोनाल्डोची गणना जगातील सगळ्यात श्रीमंत स्पोर्ट्समॅनमध्ये केली जाते. क्रिस्तियानो सध्या किंगडम सूटमध्ये फोर सीजन हॉटेलमध्ये थांबला आहे.
क्रिस्तियानो रोनाल्डो सध्या जिथे राहातोय त्या हॉटेलमध्ये त्याच्या राहत्या घरात एकूण 17 आलिशान खोल्या आहेत. या घराचे प्रति महिन्याचे भाडे 2.5 कोटी रुपये आहे.
क्रिस्तियानो रोनाल्डोचा सऊदी अरबच्या अल-नासर क्लबसोबत 3 वर्षांचा काँट्रॅक्ट झालाय. त्याअंतर्गत त्याला दरवर्षी 200 मिलीयन यूरो एवढी रक्कम मिळणार आहे
क्रिस्तियानो जेथे राहातोय ती किंगडम टॉवरमधील मध्य पूर्व भागातील सगळ्यात आलिशान इमारत आहे.
रोनाल्डो ज्या हॉटेलमध्ये थांबलाय तेथील 48 ते 50 व्या मजल्यावर एक लिविंग रूम, एक प्रायव्हेट ऑफिस आणि एक डायनिंव व एक मीडिया रूमदेखील आहे.