Fri, July 1, 2022
CSK ची नवीन मिस्ट्री गर्ल; तिच्या अदांवर घायाळ झाले फॅन्स
Published on : 29 April 2022, 11:03 am
आयपीएल 2022 मध्ये अनेक धडाकेबाज कामगिरी आपल्याला पहायला मिळाल्या आहेत. याचबरोबर या कामगिरीवर दिलखुलास प्रतिक्रिया देणाऱ्या काही मिस्ट्री गर्ल्सनी देखील आपले लक्ष वेधून घेतले आहे. यात कॅमेरामनचा भाग फार मोठा आहे. या मिस्ट्री गर्ल त्यांच्या त्यांच्या टीमला चिअर करत असतात. अशाच एका सीएसकेच्या मिस्ट्री गर्लने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ही मिस्ट्री गर्ल आहे मॉडेल श्रुती तुली. ती चेन्नईला चिअर करण्यासाठी कायम मैदानावर उपस्थिती लावते. श्रुती ही सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह असते. (CSK Mystery Girl)