sakal

बोलून बातमी शोधा

Satara : राजमाता कल्पनाराजेंची भेट घेत केसरकरांनी ताणला आदित्य ठाकरेंवर बाण

Deepak Kesarkar Kalpanaraje Bhosale

मंत्री दीपक केसरकर यांनी आज साताऱ्यात राजमाता कल्पनाराजे भोसले यांची भेट घेतली.

सातारा : बंडखोरी केल्यानंतर प्रथमच शिंदे गटाचे प्रवक्ते अन् आता मंत्रीपद मिळाल्यानंतर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) साताऱ्यात आले आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा माध्यमांनी सरकार व ठाकरे कुटुंबीयांविषयी प्रश्न उपस्थित केला असता, केसरकरांनी आपण ठाकरे कुटुंबीयांवर काहीही बोलणार नाही, असं स्पष्ट केलं.

परंतु, तिथंच काही मिनिटांत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या भूमिकेमुळं 50 आमदार दुखावल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळं दीपक केसरकर यांचा याठिकाणी सोयीस्कर यू टर्न घेतलेला पाहिला मिळाला.

मंत्री दीपक केसरकर यांनी साताऱ्यात राजमाता कल्पनाराजे भोसले (Rajmata Kalpanaraje Bhosale) यांची जलमंदिर (Jalmandir Palace Satara) आज इथं भेट घेतली.

यावेळी केसरकर म्हणाले, मी आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या कुठल्याही सदस्यावर कधीच बोलणार नाही. आपण ज्यावेळी राजकीय पक्षाचे नेते आणि मंत्री असताना वेगळी भूमिका असते. ज्यावेळी मंत्री असताना तुम्ही जनतेचे असता. त्यावेळी तुम्ही जनतेला काय दिल? हा महत्वाचा प्रश्न आहे. असं ते म्हणाले.

दादरमध्ये प्रती शिवसेना भवन उभारण्याचं काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यावर बोलताना केसरकर म्हणाले, प्रॉपर्टी बाळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आमच्यावर आरोप करणं चुकीचं आहे. विचार ही एक मोठी संपत्ती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन बाळासाहेबांचं विचार संपत आले होते. त्यांना पुनर्जीवन पुन्हा देण्यात आलं ही वस्तुस्थिती आहे.

पक्ष विचारावर चालतो. आपल्या हक्कासाठी झगडले पाहिजे. आम्ही आमचे विचार जपले आहेत. आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात विलीन झालो असतो, तर तो बाळासाहेबांच्या विचारांचा पराभव झाला असता. आदित्य ठाकरे जे- जे बोलत आहेत, त्यामुळे आमचे 50 आमदार दुखावले गेले आहेत. ते शब्द त्यांच्या तोंडून शोभत नाहीत, असंही केसरकरांनी स्पष्ट केलं. (फोटो : प्रमोद इंगळे)