'देवमाणूस'चा दोन तासांचा विशेष भाग; उलगडणार का मर्डर मिस्ट्री? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'देवमाणूस'चा दोन तासांचा विशेष भाग; उलगडणार का मर्डर मिस्ट्री?

devmanus serial
एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरून घात कऱणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी 'देवमाणूस' मालिका चांगलीच चर्चेत आहे.

एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भुरळ पाडतो. अल्पावधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते.

या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याचीकोणी कल्पनाही केली नव्हती. या मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याने आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत.

आता ही मालिका एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. डिंपल आणि अजित यांच्या लग्नाची उत्सुकता असतानाच यात सरु आजी किंवा दिव्या काय गोंधळ घालणार, डॉक्टर अजितकुमार देव ऊर्फ देवी सिंगसोबत डिंपललासुद्धा अटक होणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना पुढील भागात मिळणार आहेत.

दोन तासांच्या विशेष भागात ही रंजक मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आजवर अजितने केलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली तो डिंपलकडे देणार आहे. 

हा दोन तासांचा विशेष भाग ३० मे रोजी रविवारी संध्याकाळी सात वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

go to top