Photo : ठाण्यात आनंद दिघेंच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक, ‘धर्मवीर’ झाला रिलिज

‘धर्मवीर’ चित्रपट आज रिलीज झाला असून त्या निमित्ताने आनंद दिघेंच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करून मुहूर्त करण्यात आला.
Dharmveer movie first show in thane
Dharmveer movie first show in thane sakal
Updated on

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आज सकाळी ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये ‘धर्मवीर’ चित्रपटाचा खास शो पार पडला. यावेळी आनंद दिघे यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करण्यात आला.

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट आज १३ मे सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा पहिला शो ठाण्यात पार पडला.
‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट आज १३ मे सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा पहिला शो ठाण्यात पार पडला. sakal
जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास आज रुपरे पडद्यावर आला.
जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास आज रुपरे पडद्यावर आला.sakal
प्रवीण विठ्ठल तरडे (pravin tarde) यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. प्रसाद ओक (prasad oak) याने दिघे साहेबांची भूमिका साकारली असून त्याच्या लूकला विशेष पसंती मिळत आहे.
प्रवीण विठ्ठल तरडे (pravin tarde) यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. प्रसाद ओक (prasad oak) याने दिघे साहेबांची भूमिका साकारली असून त्याच्या लूकला विशेष पसंती मिळत आहे. sakal
आनंद दिघे (anand dighe) यांची बाळासाहेबांप्रती जी श्रद्धा होती अगदी तशीच श्रद्धा आनंद दिघे यांच्याबद्दल ठेवणारे शिष्य म्हणजे एकनाथ शिंदे. आज रिलिज आधी एकनाथ शिंदे यांनी अत्यंत मनोभावे दिघे साहेबांची पूजा केली.
आनंद दिघे (anand dighe) यांची बाळासाहेबांप्रती जी श्रद्धा होती अगदी तशीच श्रद्धा आनंद दिघे यांच्याबद्दल ठेवणारे शिष्य म्हणजे एकनाथ शिंदे. आज रिलिज आधी एकनाथ शिंदे यांनी अत्यंत मनोभावे दिघे साहेबांची पूजा केली. sakal
आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या  गुरू शिष्य नात्याची गोष्ट आणि जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे.
आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या गुरू शिष्य नात्याची गोष्ट आणि जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे.sakal
चित्रपट रिलीज होण्याआधी धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करण्यासाठी काही धार्मिक विधीही करण्यात आले.
चित्रपट रिलीज होण्याआधी धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करण्यासाठी काही धार्मिक विधीही करण्यात आले. sakal
आमदार एकनाथ शिंदे,  खासदार राजन विचारे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, ठाणे शहर महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.
आमदार एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, ठाणे शहर महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. sakal
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढवून चित्रपट प्रदर्शनाचा मुहूर्त करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढवून चित्रपट प्रदर्शनाचा मुहूर्त करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com