आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत रोबी मैतेई मोरॅंगथेमला सुवर्ण

सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद - येथे रविवारी (ता. 17) मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या आयएफबीबी डायमंड कप इंडिया या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय नौदलातील रोबी मैतेई मोरॅंगथेम (85 किलो
गट) याने अंतिम फेरीचे विजेतेपद पटकावले. 80 किलो गटाचा दास सुमन याला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले; तर तिसऱ्या पदाचा मानकरी कझाकिस्तानचा शेरबेक
टोकटोमुशेव ठरला. 

औरंगाबाद - येथे रविवारी (ता. 17) मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या आयएफबीबी डायमंड कप इंडिया या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय नौदलातील रोबी मैतेई मोरॅंगथेम (85 किलो
गट) याने अंतिम फेरीचे विजेतेपद पटकावले. 80 किलो गटाचा दास सुमन याला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले; तर तिसऱ्या पदाचा मानकरी कझाकिस्तानचा शेरबेक
टोकटोमुशेव ठरला. 

आठ गटांमध्ये ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत जगभरातून 47 देशांतून 400 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुल येथे रात्री बाराच्या सुमारास रंगलेल्या
अंतिम फेरीत भारताच्या रोबी मैतेई मोरॅंगथेम याला विजेता घोषित करण्यात आले. त्याला माजी खासदार चंद्रकांत खैरे, फेडरेशनचे अरमन्डो (नतालिया), भारताचे सचिव डॉ. संजय मोरे
यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 
 
अंतिम निकाल असा 

पुरुष क्‍लासिक 175 सेंमी गट 
यजमान औरंगाबादचा सिद्धांत मोरे, भारत (सुवर्ण), अतीश मलाला कुमार, भारत (रौप्य), वेई चेंग चेन, चायनीज तैपेई (कास्य), रहेमान खान पठाण आमेर, भारत (चौथा), सुलतान
खालेदी, यूएई (पाचवा). 
 
प्रो-कार्ड किताब 
अदाम भगवान, भारत (प्रथम), सिद्धांत मोरे, भारत (द्वितीय), किशोर पाटील, भारत (तृतीय). 
 
अंतिम निकाल 
पुरुष क्‍लासिक 171 सेंमी गट 
किशोर पाटील (सुवर्ण), श्रितिज चव्हाण (रौप्य), मोहंमद शाहरूख (कास्य), सलमान शेख (चौथा), वाल्मीक बागूल (पाचवा). 
 
पुरुष क्‍लासिक 175 सेंमीआतील गट 
अदाम भगवान, भारत (सुवर्ण), अब्दुल्ला रसूल, इराक (रौप्य), शोकमीन हॉंग, मंगोलिया (कास्य), लव्हली शर्मा, भारत (चौथा), सुखदेव गलांडे, भारत (पाचवा). 
 
पुरुष 75 किलो गट

शेख नौशाद, भारत (सुवर्ण), पद्मनाभन सनाल, भारत (रौप्य), एन. चौरगे तुषार, भारत (कास्य), प्रमोद कुमार कृष्णा, भारत (चौथा), ची कॉग्न ली, मलेशिया
(पाचवा), हरिदास टी., भारत (सहावा). 
 
पुरुष 60 किलो गट
बहादूर दधा राम, नेपाळ (सुवर्ण), सी. व्ही. अरुणदास, भारत (रौप्य), पी. दित जगेन्श, भारत (कास्य), खाता सिंग, भारत (चौथा), आर. बालाजी, भारत (पाचवा), दीपक सोनवणे,
भारत (सहावा). 
 
पुरुष 70 किलो गट
जगदीश कम्पम, भारत (सुवर्ण), संकेत श्‍याम भाराम, भारत (रौप्य), चौत्रे कमाल, भारत (कास्य), शरीफ अल अमीन बांगलादेश (चौथा), आरिफ एसके, भारत (पाचवा), काथोड भाईर
अरुण, भारत (सहावा). 
 
पुरुष 85 किलो गट 
रोबी मैतेई मोरॅंगथेम भारत (सुवर्ण), कुन चुंग लुई चायनीज, तैपेई (रौप्य), प्रल्हाद सिंग, भारत (कास्य) 
 
पुरुष 90 किलो गट 
शेरबेक टोकटोमुशेव, कझाकिस्तान (सुवर्ण), अली हसन फरहान, इराक (रौप्य), फर्नांडो मार्टिनेज स्पेन (कास्य), सिंग टी. दुशांता, भारत (चौथा) सिंग आंबूस, भारत (पाचवा) अविनाश
वाघुले, भारत (सहावा) 
 
पुरुष 100 किलो गट 
जुबेर अहेमद - इराक (सुवर्ण), यू हसिउंग यांग - चायनीज तैपेई (रौप्य), काशीनाथ मयूर, भारत (कास्य), कुमार क्रिशन भारत- चौथा, के. नायडू कार्तिक भारत (पाचवा), संतोष वाघ,
भारत (सहावा) 
 
पुरुष 100 किलोपुढील गट 
अली सलमान अब्दुल्ला, इराक, सुवर्ण, ज्ञानेश्वर किशोर, भारत रौप्य, ओंकार कापरे, भारत (कास्य)