Diwali Festival 2021 : दिल्लीतील 'या' 5 बाजारांमध्ये करा दिवाळीची स्वस्त-मस्त शॉपिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीतील 'या' 5 बाजारांमध्ये करा दिवाळीची स्वस्त-मस्त शॉपिंग

दिल्लीतील 'या' 5 बाजारांमध्ये करा दिवाळीची स्वस्त-मस्त शॉपिंग

दिवाळी आता सुरू झाली आहे. अशावेळी लोक घर सजविण्यासाठी साफ सफाई सुरु करतात, तर काही लोक नवीन शॉपिंग करतात. भारतासह काही देशांमध्ये हा सण साजरा केला जातो. पण, पण दिल्लीतील दिवाळीबाबत बोलायचे झाले तर तेथील दिवाळी खूप खास असते. येथील बाजारांमधील लगबग, झगमगाट पाहण्यासारखा असतो. दिवाळीत दिल्लीमध्ये सगळीकडे झगमगाट आणि उत्साह दिसतो पण दिल्लीतील काही बाजारांमधील हे दृश्य वेगळे असते. येथे दिवाळी सणामध्ये लागणारी प्रत्येक वस्तू सहज मिळते मग, ती खाण्याची वस्तू असतो किंवा सजविण्याची. येथील बाजारांमध्ये प्रत्येक सामानाच्या खूप व्हरायटी आहेत. चला जाणून घेऊ या दिल्लीमधील त्या बाजारांमध्ये जिथे तुम्ही दिवाळीची शॉपिंग करू शकता.

चांदणी चौक -
दिल्लीतील बाजारांचा विषय निघाला आहे तर चांदणी चौकचा उल्लेख होणार नाही हे शक्यच नाही. हे दिल्लीतील सर्वात जुना आणि प्रसिध्द मार्केट आहे. तसे पाहायला गेले तर हा बाजार आपल्या नव्या लूकसाठी खूप चर्चेमध्ये आहे. येथून तुम्ही कपडे आणि ज्वेलरीची खरेदी करू शकता. या बाजाराला जोडून इतर मार्केट आहे जिथे तुम्हाला सर्व काही मिळेल. आणि तुम्हाला जर चाट खाण्याची इच्छा असेल तर त्याचा आनंद लुटू शकता. हा बाजार आठवड्यामधून सहा दिवस सुरु असतो आणि रविवारी बंद असतो.

चांदणी चौक - दिल्लीतील बाजारांचा विषय निघाला आहे तर चांदणी चौकचा उल्लेख होणार नाही हे शक्यच नाही. हे दिल्लीतील सर्वात जुना आणि प्रसिध्द मार्केट आहे. तसे पाहायला गेले तर हा बाजार आपल्या नव्या लूकसाठी खूप चर्चेमध्ये आहे. येथून तुम्ही कपडे आणि ज्वेलरीची खरेदी करू शकता. या बाजाराला जोडून इतर मार्केट आहे जिथे तुम्हाला सर्व काही मिळेल. आणि तुम्हाला जर चाट खाण्याची इच्छा असेल तर त्याचा आनंद लुटू शकता. हा बाजार आठवड्यामधून सहा दिवस सुरु असतो आणि रविवारी बंद असतो.

पहाडगंज -
तुम्हाला वर्षभर या मार्केटमध्ये लगबग पाहायला मिळते.   खूप लांबून लोक जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येथे येतात. तुम्हाला येथे दिवाळीच्या सामानाची खरेदी करता येईल. येथे  तुम्ही काही अॅन्टिक कंदिल खरेदी करू शकता. ड्रायफ्रुटस खरेदी करण्यासाठी तुम्ही बाजारामध्ये येऊ शकता. हा बाजार रोज सुरु असतो.

पहाडगंज - तुम्हाला वर्षभर या मार्केटमध्ये लगबग पाहायला मिळते. खूप लांबून लोक जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येथे येतात. तुम्हाला येथे दिवाळीच्या सामानाची खरेदी करता येईल. येथे तुम्ही काही अॅन्टिक कंदिल खरेदी करू शकता. ड्रायफ्रुटस खरेदी करण्यासाठी तुम्ही बाजारामध्ये येऊ शकता. हा बाजार रोज सुरु असतो.

दरिबा कलां -
हे मार्केट चांदीच्या सामानासाठी फेमस आहे. येथे तुम्ही बोबेमियान स्टाईल ज्वेलरी सहज उपलब्ध आहेत. तसेच तुम्हाला येथून काही आर्टिफिशिअल ज्वेलरीची शॉपिंग करता येईल.

दरिबा कलां - हे मार्केट चांदीच्या सामानासाठी फेमस आहे. येथे तुम्ही बोबेमियान स्टाईल ज्वेलरी सहज उपलब्ध आहेत. तसेच तुम्हाला येथून काही आर्टिफिशिअल ज्वेलरीची शॉपिंग करता येईल.

तिब्बती बाजार -
दिवाळीच्या निमित्त येथे खूप लगबग आणि उत्साह असतो. तुम्ही येथे डिझायनर वस्तू खरेदी करू शकता. येथे हॅन्डक्राफ्ट सामान देखील खूप चांगले मिळतो. येथेही तुम्हाला आर्टिफिशिअल ज्वेलरीची शॉपिंगसाठी खूप पर्याय मिळतील.

तिब्बती बाजार - दिवाळीच्या निमित्त येथे खूप लगबग आणि उत्साह असतो. तुम्ही येथे डिझायनर वस्तू खरेदी करू शकता. येथे हॅन्डक्राफ्ट सामान देखील खूप चांगले मिळतो. येथेही तुम्हाला आर्टिफिशिअल ज्वेलरीची शॉपिंगसाठी खूप पर्याय मिळतील.

अट्टा मार्केट -
नोएडा सेक्टर 18 मेट्रे स्टेशनच्या खाली हा बाजार सुरु असतो. दिवाळीच्या वेळी हे मार्केट खूप सुंदरतेने सजविला जातो. तुम्ही येथे कपडे आणि घर सजविण्यासाठी चांगले सामान स्वस्तामध्ये खरेदी करू शकता. हा बाजार बुधवारी बंद असतो.

अट्टा मार्केट - नोएडा सेक्टर 18 मेट्रे स्टेशनच्या खाली हा बाजार सुरु असतो. दिवाळीच्या वेळी हे मार्केट खूप सुंदरतेने सजविला जातो. तुम्ही येथे कपडे आणि घर सजविण्यासाठी चांगले सामान स्वस्तामध्ये खरेदी करू शकता. हा बाजार बुधवारी बंद असतो.

टॅग्स :Diwali Festivaldelhi
go to top