औषधी गुणधर्म असणारी शेवग्याची भाजी वर्षभर 'खा', विकारांवर उपयोगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औषधी गुणधर्म असणारी शेवग्याची भाजी वर्षभर 'खा', विकारांवर उपयोगी

औषधी गुणधर्म असणारी शेवग्याची भाजी वर्षभर 'खा', विकारांवर उपयोगी

शेवग्याची भाजी मृग नक्षत्र सुरू झाले, की खाल्ली जाते. मात्र, मृग नक्षत्र झाले, की ही भाजी वर्षभर खाल्ली जात नाही. शेवग्याची शेंग जशी वर्षभर खाल्ली जाते, तशाच पद्धतीने पानांची भाजीही पावसाळा अन्‌ हिवाळ्यात खाल्ली पाहिजे. पानांत अनेक महत्त्वाचे घटक आहेत, जे आरोग्य सुदृढ करतात. शेवग्याची फुले, पाने, शेंगांचा पाककृतीत वापर होतो. तुरट असूनही चवीला असलेला शेवगा ३०० विकारांवर मात करणारा, कुपोषण थांबविणारा आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीचे १५ दिवस म्हणजे एक महिन्याच्या कालावधीला ‘ऋतू संधीकाळ’ म्हणतात, कारण वातावरण बदल सुरू होतात. या कालावधीत पाण्यातही बदल होतात. पाणी गढूळ होते.

पावसाळ्याच्या सुरुवातीचे १५ दिवस म्हणजे एक महिन्याच्या कालावधीला ‘ऋतू संधीकाळ’ म्हणतात, कारण वातावरण बदल सुरू होतात. या कालावधीत पाण्यातही बदल होतात. पाणी गढूळ होते.

पाण्यात अनेक घातक घटक विरघळतात. पावसाळी पाण्यातून अनेक जलजन्य आजार शरीरात उद्‌भवतात. पचन संस्थेचे आजार होतात. अशा वेळी शेवग्याच्या पानांची भाजी अशा आजारांवर उपयुक्त ठरते. ऋतू संधीकाळाबरोबर पावसाळा अन्‌ हिवाळ्यातही ही पानांची भाजी आवश्‍य खावी.

शेवग्याच्या भाजीचे महत्त्व 

रक्तदाब नियंत्रित, आतड्यांची जखम बरी करणारी, पित्त नियंत्रित,

पानाच्या रसात मध घालून अंजन केल्यास डोळ्यांचे विकार बरे होतात,
 
पानाच्या रसात मिरे वाटून लावल्यास डोकेदुखी थांबते, 

रसाने मॉलिश केल्यास केसातील कोंडा जातो

शेवग्याच्या भाजीचे महत्त्व रक्तदाब नियंत्रित, आतड्यांची जखम बरी करणारी, पित्त नियंत्रित, पानाच्या रसात मध घालून अंजन केल्यास डोळ्यांचे विकार बरे होतात, पानाच्या रसात मिरे वाटून लावल्यास डोकेदुखी थांबते, रसाने मॉलिश केल्यास केसातील कोंडा जातो

शेवग्याचा पाला काहीसा तुरट-कडवट चवीचा असतो. मात्र, भाजी केल्यावर तो चविष्ट लागतो. पानांची सुकी भाजी, पातळ भाजी, वड्या, भजी, टिकिया, सूप, झुणका, थालीपीठ, शेवगा पुलाव, शेवगा फुलांची भाजी, फुलांचे भरीत, शेंगेची रसभाजी, पानांची कढी केली जाते.

निसर्गमित्र संस्थेतर्फे १० वर्षे शेवगा महोत्सवाचे आयोजन केले. पाककृती, लागवड, शेवग्याचे महत्त्व लोकांना सांगितले जाते. अनेक लोक ग्रामीण भागात गावरान शेवगा घेत आहेत. त्यामुळे लोकांनी पावसाळा, हिवाळ्यात पानाच्या भाजीचा अन्नात उपयोग केला पाहिजे.’’

तोंड येणे, गळ्याची सूज, वांती, खरुजवर भाजी खावी,

शारीरिक थकवा, हाडांची कमजोरी, कृमीवर उपयुक्त,
 
पचनक्रियेशी संबंधित आजार नष्ट होतात

तोंड येणे, गळ्याची सूज, वांती, खरुजवर भाजी खावी, शारीरिक थकवा, हाडांची कमजोरी, कृमीवर उपयुक्त, पचनक्रियेशी संबंधित आजार नष्ट होतात

काविळीवर पानांचा ताजा रस, एक चमचा मध, नारळ पाणी एकत्र करून घ्यावे'

जठराचा कर्करोग टाळण्यासाठी भाजीचा उपयोग,
 
फुलांची भाजी संधिवातासाठी उत्तम

काविळीवर पानांचा ताजा रस, एक चमचा मध, नारळ पाणी एकत्र करून घ्यावे' जठराचा कर्करोग टाळण्यासाठी भाजीचा उपयोग, फुलांची भाजी संधिवातासाठी उत्तम

go to top