आषाढी २०२० : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आषाढी यात्रेच्या निमित्ताने केलेली विद्युत रोषणाई

रविवार, 28 जून 2020

पंढरपूर (सोलापूर) : यंदा आषाढी यात्रा भरणार नसली तरी यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या मनमोहक विद्युतरोषणाई मुळे श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसर उजळून निघाला आहे. पुण्यातील लाइटिंग कॉन्ट्रॅक्टर विनोद जाधव हे गेल्या काही वर्षांपासून आषाढी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर मनमोहक विद्युत रोषणाई करून देत असतात.

पंढरपूर (सोलापूर) : यंदा आषाढी यात्रा भरणार नसली तरी यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या मनमोहक विद्युतरोषणाई मुळे श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसर उजळून निघाला आहे. पुण्यातील लाइटिंग कॉन्ट्रॅक्टर विनोद जाधव हे गेल्या काही वर्षांपासून आषाढी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर मनमोहक विद्युत रोषणाई करून देत असतात. यंदा को रोनाच्या संकटामुळे आषाढी यात्रा भरणार नसली तरी विनोद जाधव यांनी विद्युतरोषणाई करण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे परवानगी मागितली होती. मंदिर समितीने त्यांना परवानगी दिल्यानंतर त्यांनी पुण्यातून रोषणाई साठी आवश्यक मटेरियल पंढरपुरात पोच केले. पंढरपुरातील स्थानिक काही वायरमेन च्या मदतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई यंदा करून घेण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला या रोषणाईसाठी एक रुपयाही खर्च करावा लागलेला नाही. आषाढी एकादशी दिवशी दरवर्षी पुण्यातील भुजबळ हे रंगीबेरंगी फुलांची मनमोहक आरास विनामूल्य करून देत असतात. यंदादेखील त्यांच्याकडून आवश्यक फुले आणि तोरणे करून पाठवली जाणार आहेत. मंदिर समितीचे कर्मचारी आणि स्थानिक माळी बंधूंच्या मदतीने आषाढी एकादशी दिवशी फुलांची सजावट देखील केली जाणार आहे अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. (शब्दांकन : अभय जोशी, छायाचित्रे : सतीश चव्हाण, पंढरपूर)