sakal

बोलून बातमी शोधा

Engineers Day: हे ५ सिनेमे पाहिले नाहीत तर तुम्ही खरे इंजिनियर नाहीच!

Engineers Day: 5 Bollywood Movies Every Aspiring Engineer Must Watch!

Engineers Day: मनोरंजन विश्वात चित्रपट तयार करताना विविध विषयांना हात घातला जातो. आपल्याकडे अनेक चित्रपट हे खासकरून तरुणांना आकर्षित करण्यासाठी केले जातात, आणि जेव्हा तरुणांचा विषय येतो तेव्हा कॉलेज, कॉलेज लाईफ ही आलीच. त्यातही असे काही सिनेमे आहेत ज्यांचा थेट एंजिनियरिंगशी संबंध आहे. म्हणून आज एंजिनियर्स डे निमित्त जाऊन घेऊया असे कोणते पाच सिनेमे आहेत जे आपण प्रत्येकाने आणि सर्व इंजिनियर्सने पाहायलाच हवेत.. (Engineers Day: 5 Bollywood Movies Every Aspiring Engineer Must Watch!

)

3 इडियट्स: एंजिनियरिंगशी सर्वात जवळचा संबंध असलेला चित्रपट म्हणजे 3 इडियट्स. एंजिनियरिंगचे विद्यार्थी, तिथलं वातावरण, कॅम्पस येणारी आव्हाने या सगळ्याचा परामर्श घेणारा हा चित्रपट होता. अमीर खान, आर माधवन, शर्मन जोशी  आणि करीना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रत्येकाला वेड लावलं होतं.

उडान: उत्तम संहिता असलेला आणि समीक्षकांनी नावाजलेला चित्रपट म्हणजे उडान. वास्तविक जीवनातील अनुभवांना पडद्यावर मांडणारा हा चित्रपट विशेष ठरला. इंजिनिअरिंगचे प्रस्थ इतके आहे की अनेकांना स्वतःच्या इच्छा बाजूला सारून केवळ दबावामुळे इंजिनियरिंग करावे लागते. अशा अनेक विद्यार्थ्यांना न्याय देणारा त्यांची बाजू मांडणारा विशेष म्हणजे तुम्हाला जे हवं ते तुम्ही बिनधास्त करा हे सांगणारा हा चित्रपट होता.

तमाशा : विद्यार्थी प्रशिक्षण घेतात, त्यांची अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करतात, महाविद्यालयात प्रवेश घेतात, पदवी पूर्ण करतात आणि शेवटी नोकरी मिळवतात, तरीही त्यांच्या खऱ्या आनंदापासून दूर असतात. तमाशा हा चित्रपट अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना पालकांच्या दबावाखाली अभियांत्रिकी पदवी मिळवावी लागते. सामाजिक आणि पालकांच्या दबावाला न जुमानता आपल्या स्वप्नाना आकार देणारा हा चित्रपट आहे.

साडा अड्डा: 'तुमची स्वप्ने पूर्ण करण्यापासून तुम्हाला रोखू शकणारी एकमेव गोष्ट ,म्हणजे तुम्ही स्वतः आहात' हे सांगणारा हा चित्रपट आहे. कॉलेज लाईफ, मैत्री, शिक्षण असे अनेक पैलू असलेला हा चित्रपट आहे.

लक्ष्य: अंगावर शहारे आणि प्रचंड प्रेरणा देणारा चित्रपट म्हणजे लक्ष्य. हा चित्रपट आपल्याला आयुष्यातील ध्येय कसं गाठायचं हे सांगतो.  हृतिक रोशनने साकारलेल्या या चित्रपटाच्या नायकाप्रमाणे, बरेच विद्यार्थी त्यांच्या करिअरच्या निवडीबद्दल अनभिज्ञ असतात,  मात्र, शेवटी आपले ध्येय ओळखून ते साध्य ककरण्याचा प्रवास यात आहे.